तरुणाने मित्राच्या दिशेने फेकलेलं जॅकेट चक्क रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर जाऊन पडल्याचा प्रकार घडला आहे. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास मुंबईतल्या चर्चगेट स्टेशनवर ही घटना घडली. याप्रकरणी तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाचे म्हणजे या घटनेमुळे लोकल रेल्वेची वाहतूकही काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

हेही वाचा – मुंबई : आरटीईनुसार आरक्षित जागांसाठी २३ जुलैपासून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू, ४ हजार ७३५ विद्यार्थ्यांची निवड

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी सुमीत भाग्यवंत नावाचा १९ वर्षीय तरुण चर्चेगेट स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उभा होता. तसेच त्याचा एक मित्र प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उभा होता. सुमीतला त्याच्याकडे असेलेले जॅकेट प्लॅटफॉर्म क्रमांक २ उभा असलेल्या मित्राला द्यायचे होते. त्यासाठी त्याने प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरूनच हे जॅकेट मित्राकडे फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे जॅकेट थेट रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर जाऊन पडलं.

हेही वाचा – मुंबई: १३ अभियंत्यांना महापालिकेची नोटीस, खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे कारवाई

या घटनेची माहिती मिळताचा रेल्वे पोलिसांनी प्लॅटफॉर्मवर पोहोचत हे जॅकेट काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर हे जॅकेट सुमीत भाग्यवंत नावाच्या तरुणाचे असल्याचे पुढे आलं. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत सुमीतला ताब्यात घेतले. तसेच त्याला न्यायालायात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्याला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.