मालवणी येथे ३४ वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याचा प्रकार घडला. या हल्ल्यानंतर जखमी महिलेला (२७) यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी महिलेचा २०१९ मध्ये प्रेमविवाह झाला होता. पण तिचा पती बेरोजगार असून त्याला अमलीपदार्थाचे व्यसन असल्याचे महिलेला समजले. तसेच पतीचे एका तृतीयपंशीसोबत प्रेमसंबंध असल्याचे महिलेला समजले होते. त्यामुळे तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सदनिकेच्या नावाखाली २१ कोटींची फसवणूकप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा, ३५ जणांची फसवणूक केल्याचा आरोप

महिला गेल्या तीन महिन्यांपासून मालाड पश्चिम येथे तिच्या आईच्या घरी राहत होती. बुधवारी पहाटे तिचा पती तिच्या आईच्या घरी घुसला. त्याने महिलेचा आणि तिच्या भावाचा मोबाईल संच उचलला. त्यानंतर त्याने महिलेच्या चेहऱ्यावर ज्वलनशील द्रव्य (कथित ॲसिड) फेकले. महिलेचा चेहेरा भाजून चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. जखमी महिलेला तिच्या आईने तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पती विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२४(२), ३११, ३३३ आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man throws acid on wife face shocking incident in malvani mumbai print news zws