Man Urinates In Pants At Bryan Adams Show: कॅनेडियन रॉक लिजेंड ब्रायन ॲडम्सचा लाईव्ह कॉन्सर्ट १३ डिसेंबर रोजी मुंबईत संपन्न झाला. बॉम्बे कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर येत या कॉन्सर्टचे आयोजन झोमॅटोकडून करण्यात आले होते. हजारो लोक याठिकाणी आलेले असतानाही पुरेशा सुविधा मात्र उपलब्ध करून देण्यात आलेल्या नव्हत्या. केवळ तीनच शौचालय याठिकाणी उभारल्यामुळे अनेकांना रांगेत बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. यानंतर मधमुमेहाने ग्रस्त असललेल्या एका व्यक्तीला पँटमध्येच लघवी करावी लागली. या प्रकरणानंतर सदर व्यक्ती शेल्डन अरांजो झोमॅटोचे सीईओ दिंपीदर गोयल, ईव्हीएग्लोबल इव्हेंट्स यांना पत्र लिहून नाराजी कळवली.

अरांजो हे माध्यम क्षेत्रात काम करतात. त्यांनी लघवी केल्यानंतर ओल्या झालेल्या पँटचाही फोटो काढला आहे. मी मधुमेहाचा रुग्ण असल्यामुळे हे दाखण्यास मला जराही कमीपणा वाटत नाही, असेही ते म्हणाले. “ब्रायन ॲडम्सच्या कॉन्सर्टमध्ये मी माझ्या पँटमध्येच लघवी केली. धक्का बसला ना? बॉम्बे कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटरमध्ये मला जोरात लघूशंका आली होती. शौचालयाकडे गेलो तर तिथे तीनही शौचालयाबाहेर भलीमोठी रांग लागली होती. मला तोपर्यंत थांबणे शक्य नव्हते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना याबाबत सांगितले. तेव्हा मला दुसऱ्या बाजूला सांगण्यात आले. पण तिथे गेल्यानंतर तिथले शौचालय वेगळ्या श्रेणीसाठी आरक्षित असल्याचे समजले. त्यानंतर मात्र मला सहन झाले नाही आणि झाडामागे जाऊन मी पँडमध्येच लघवी केली”, अशी पोस्ट शेल्डन अरांजो यांनी लिंक्डिनवर टाकली.

ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”

ब्रायन ॲडम्सच्या कॉन्सर्टचे व्यवस्थापन झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी केले होते. मात्र कॉन्सर्टमध्ये व्यवस्थापनचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले. शेल्डन अरांजो यांनी आपल्या पोस्टमध्ये दीपंदर गोयल यांना टॅग केले आहे. तसेच एवढ्या प्रचंड गर्दीसाठी केवळ तीन शौचालय उपलब्ध करून देणाऱ्यांना लाज वाटली पाहीजे, असेही ते म्हणाले. तसेच कॉन्सर्टमध्ये इतरही अनेकजणांनी विविध तक्रारी बोलून दाखविल्या होत्या, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

ब्रायन ॲडम्स सध्या विश्व दौऱ्यावर आहे. भारतातील सहा शहरांमध्ये त्याचा शो होणार आहे. ८ डिसेंबर रोजी कोलकाता येथे कॉन्सर्ट झाल्यानंतर १३ डिसेबंर रोजी मुंबईत कॉन्सर्ट पार पडला.

Story img Loader