बनावट नोटांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या व २००० रूपयांच्या नव्या नोटा व्यवहारात आणल्या. परंतु २००० रूपयांच्या बनावट नोटाही आता बाजारात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच अंधेरी येथील एका वाईनशॉपमध्ये दोन हजार रूपयांची बनावट नोट देऊन मद्य खरेदी केल्याचा प्रकार घडला. ही घटना ताजी असतानाच विरार (पश्चिम) येथील एका वाईनशॉपमध्ये असाच प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला महागात पडला. दुकानदाराने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तुषार चिखले (वय २६, रा. विरार पूर्व) असे या युवकाचे नाव असून तो २००० रूपयांची बनावट नोट देऊन बिअर खरेदी करत होता.
रविवारी (दि. २६) सांयकाळी चिखले हा विरार (पश्चिम) येथील एका वाईनशॉपमध्ये बिअर खरेदी करण्यासाठी गेला होता. त्याने यासाठी दुकानदाराला २००० रूपयांच्या नव्या नोटेची कलर झेरॉक्स प्रत दिली. परंतु वाईनशॉपचे मालक विश्वनाथ शेट्टी यांना लगेचच ही नोट बनावट असल्याची लक्षात आले. चिखले तेथून पळून जाण्यापूर्वीच त्यांनी त्याला पकडले.
चिखलेकडून मोठ्याप्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आले असून २००० रूपयांच्या नोटेची अचूक झेरॉक्स काढण्यासाठी त्याने किमान ४ ते ५ प्रिंट काढली असण्याची शक्यता विरार पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी चिखलेला मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चिखलेबरोबर आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्याचबरोबर चिखलेने या नोटांची झेरॉक्स कॉपी कुठे काढली याचाही शोध घेण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा