प्रख्यात एन. एम. मॅनेजमेंट महाविद्यालयात एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत डमी विद्यार्थी बसून प्रवेश मिळवून देण्याचा अनोखा आणि धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांनी गुरुवारी उघडकीस आणला. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा आणि सायबर सेलने संयुक्तपणे कारवाई करून ६ जणांना अटक केली आहे. त्यात अभियांत्रिकीचे कोचिंग क्लासेस घेणाऱ्यासह परीक्षेला डमी विद्यार्थी म्हणून बसणाऱ्या एका जॉकीचा समावेश आहे.
‘नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ या महाविद्यालयात एमबीएच्या अभ्यासक्रमासाठी ‘एन मॅट’ ही ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेतली जाते. राष्ट्रीय पातळीवरील ही परीक्षा ‘पीअरसन व्ह्य़ू’ या सॉफ्टवेअर कंपनीमार्फत घेतली जायची. या महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्यासाठी सहा जणांची एक टोळी सक्रिय होती. ही टोळी ज्यांना अभ्यासक्रमाला प्रवेश हवा आहे अशांकडून १५ ते २० लाख रुपये घेत असे. त्या विद्यार्थ्यांच्या जागी डमी विद्यार्थी बसवून मूळ विद्यार्थ्यांला परीक्षा उत्तीर्ण करून देत असे. ही टोळी हुशार तरुणांना डमी विद्यार्थी (जॉकी) म्हणून बसवत असे. हे डमी परीक्षा सहज उत्र्तीण होत, मात्र काही वेळा डमी विद्यार्थीही अनुत्तीर्ण झाले, अशी माहिती सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय (गुन्हे) यांनी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी पवन कुमार (३६), गजेंद्र प्रताप (२९), हिमांशू शेखर (२८), हनुमंतसिंग गुजर (२९), सुग्रीवसिंग गुजर (३०) यांच्यासह परीक्षेला डमी विद्यार्थी म्हणून बसणाऱ्या आलोक कुमार (३६) या तरुणांना अटक केली आहे. पवन कुमार एमबीए असून, गाझियाबाद येथे अभियांत्रिकीचे कोचिंग क्लासेस घेतो. गुजर बंधू बी. टेक. असून, तेसुद्धा कानपूर आणि झाशी येथे कोचिंग क्लासेस चालवतात. आलोक हासुद्धा बी. टेक. असून, तोही बी. टेक.चे क्लासेस घेतो.
एमबीए प्रवेशासाठी ‘डमी मॅनेजमेंट’
प्रख्यात एन. एम. मॅनेजमेंट महाविद्यालयात एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत डमी विद्यार्थी बसून प्रवेश मिळवून देण्याचा अनोखा आणि धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांनी गुरुवारी उघडकीस आणला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-05-2013 at 05:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Management of dummies for mba admission