एक खिडकी कार्यपद्धती

मुंबई : गणेशोत्सव जवळ आला असून गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया शुक्रवार, ७ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून लहान-मोठ्या, तसेच पीओपीपासून चार फुटांहून अधिक उंच गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना कार्यशाळांच्या मंडपासाठी, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मूर्ती साठवणुकदारांना मंडप परवानगी देण्यासाठी शुक्रवारी सकाळी १ १ वाजल्यापासून एक खिडकी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. पोलीस, वाहतूक पोलीस व अग्रिशमन दल या सर्व यंत्रणांच्या प्रक्रिया एकाच ठिकाणी होणार आहेत. यंदा साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मूर्तिकार व गणेशमूर्ती साठवणूकदारांना मंडप परवानगीसाठी एक हजार रुपये सुरक्षा अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

हेही वाचा >>> मनसेने ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला हे खरं आहे का? आमदार वैभव नाईक म्हणाले…

uran panje flamingos
Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Why Hindu gods dance
हिंदू देवता नृत्य करतात तर इतर धर्मातील देव नृत्य करत नाहीत असे का?। देवदत्त पट्टनायक यांच्याबरोबर कला आणि संस्कृती
bmc will provide free Shadu soil and space to sculptors for eco friendly Ganeshotsav
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना पुढील वर्षीही शाडूची माती मोफत देणार
art market Best Visual Arts Art exhibitions
कलाकारण : आपल्या काळाकडे प्रयत्नपूर्वक पाहणं…
After 12 years the alliance of Jupiter and Moon will brighten the fortunes of 4 zodiac signs dreams will be fulfilled in 2025
१२ वर्षांनंतर गुरू आणि चंद्रच्या युतीने ४ राशींचे भाग्य उजळणार, २०२५मध्ये स्वप्न होतील पूर्ण, घर-वाहन खरेदीचा निर्माण होईल योग
unauthorized construction, Shri Gopal lal Mandir temple, Mira Road,
मिरा रोड येथे मंदिराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई
Venus jupiter combination Navpancham Rajayoga
आजपासून नुसती चांदी; नवपंचम राजयोग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रसिद्धी आणि प्रत्येक कामात यश

गणेश मूर्तिकारांना दरवर्षी गणेशमूर्ती कार्यशाळेसाठी महानगरपालिका, वाहतूक पोलीस व अग्निशमन दलाची परवानगी घ्यावी लागते. परवानगी मिळविण्यासाठी मूर्तिकारांना वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस ठाणे आणि अग्निशमन दलाकडे स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. त्यांनी परवानगी दिल्यानंतरच मुंबई महापालिकेकडून मंडपासाठी परवानगी मिळत होती. विशेष म्हणजे अर्ज करण्यासाठी मूर्तिकारांना स्वतः सर्वत्र फिरावे लागत होते. मात्र आता मूर्तिकारांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मंडप परवानगी देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने एक खिडकी कार्यपद्धती सुरू केली आहे.

हेही वाचा >>> मुंबई: धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती, पाणीसाठा १८.२९ टक्क्यांवर

मंडप परवानगीसाठी मूर्तिकार, मूर्ती साठवणुकदाराला अर्जासह स्वतःच्या आधार कार्डाची स्वयंसाक्षांकीत प्रत जोडावी लागणार आहे. त्याशिवाय हमीपत्र देणे बंधनकारक आहे. ऑनलाईन प्रणालीतून हे हमीपत्र डाऊनलोड करावे, त्यावर संबंधितांनी स्वाक्षरी करून अपलोड करावे व अर्जासह सादर करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. गणेश मूर्तिकारांनी मागील वर्षी दिलेल्या मंडप परवानगीचा क्रमांक अर्जामध्ये नमूद करावा. ज्या मूर्तिकारांनी यापूर्वी विभाग कार्यालयात असंगणकीय पद्धतीने (ऑफलाईन) अर्ज केला होता, त्यांनी त्याची प्रत संगणकीय अर्जासह सादर करावी, असेही आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

ही ऑनलाईन सुविधा मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मंडळांना २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सायंकाळी ५.३० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Story img Loader