ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ मुंबईत मोठी कारवाई; तीन किलोंचे मांडूळ हस्तगत
ठाणे आणि नवी मुंबईपाठोपाठ मुंबईच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने मांडूळ किंवा दुतोंडय़ा या दुर्मीळ जातीचा साप अवैधपणे विक्रीसाठी माझगाव परिसरात आलेल्या तरुणाला अटक केली. नावेद कय्युम शेख असे या तरुणाचे नाव असून तो विरारचा रहिवासी आहे. त्याच्या ताब्यातून तब्बल तीन किलो वजनाचे आणि साडेचार फूट लांबीचे मांडूळ हस्तगत करण्यात आले. भारतीय बाजारपेठेत या मांडुळाची किंमत तीस लाखांहून पुढे आहे. अंधश्रद्धा, अघोरी कर्मकांड आणि परदेशातील तस्करीसाठी या जातीच्या सापांची तस्करी, लाखो रुपयांमध्ये अवैधपणे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात, अशी माहिती या कारवाईच्या निमित्ताने पुढे आली आहे.
याआधी ठाणे गुन्हे शाखा व नवी मुंबई पोलिसांनी या दुर्मीळ जातीचे साप हस्तगत करून तस्करी रोखली होती. मात्र मुंबईत अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. अटक केलेला आरोपी नावेद हा साप तीस लाखांना विकणार होता, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक विनायक मेर यांना नावेदबाबत आगाऊ माहिती मिळाली होती. त्यानुसार साहाय्यक निरीक्षक चंद्रकांत दळवी, लक्ष्मीकांत साळुंखे, दीप बने, सुनील माने, अंमलदार दत्तात्रय कोळी, सुनील कांगणे, चंद्रकांत वलेकर आणि पथकाने सापळा रचून नावेदला अटक केली. विरारमध्ये जमीन खरेदी-विक्रीत दलाली करतो, नाशिकच्या एका आदिवासी शेतकऱ्याकडून किरकोळ किमतीत मांडूळ विकत घेतल्याचा दावा नावेदने चौकशीत केला. पथक या माहितीची खातरजमा करत आहे. नावेद हा वन्यजीवांच्या तस्करीत सराईत असावा, असा संशय पथकाला आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार वन्यजीव संरक्षक अधिकाऱ्यांच्या समक्ष हस्तगत मांडूळ इगतपुरीच्या जंगलात सोडण्यात आल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.
- मांडूळ साप घरात ठेवल्यास भरभराट होते, त्याच्या समक्ष पूजा-अर्चा किंवा अन्य कर्मकांड केल्यास पैशांचा पाऊस पडतो, याशिवाय अमावस्येच्या रात्री मांडुळाच्या साक्षीने अघोरी कर्मकांड, जादूटोणा केल्यास त्यास यश मिळते, मांडूळ गुप्त धन शोधते या अंधश्रद्धा समाजात आहेत.
- चीन व जपान या देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मांडुळांची तस्करी केली जाते. तिथे या जातीच्या सापांपासून औषध तयार केले जाते.
- अंधश्रद्धेमुळे हे साप पकडून त्यांची मुंबईसारख्या मोठय़ा शहरांमध्ये लाखो रुपयांना विक्री केली जाते. त्यात नोंदणीकृत नसलेल्या सर्पमित्रांपासून मांडुळांच्या शोधार्थ फिरणाऱ्या तस्कर टोळय़ांचा सहभाग आहे.
- वजन व लांबीवर मांडुळाची किंमत निश्चित होते. उत्तरोत्तर ती वाढत जाते.