लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदारांना आपले नाव मतदारयादीत समाविष्ट करता यावे, तसेच या संपूर्ण प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्यावी अशी मागणी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे, निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लोढा यांनी पत्र पाठवून वरील मागणी केली आहे.

Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
Various questions were asked to Ajit Pawars MLA Anna Bansode through board
पिंपरी विधानसभा: फलकाद्वारे अजित पवारांच्या आमदाराला विचारण्यात आले विविध प्रश्न; गुन्हेगारी, वाहतूक कोंडीचा केला उल्लेख
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
maharashtra assembly election 2024, Mahayuti Campaign, Palghar, Dahanu,
महायुतीच्या प्रचारात गुजरातमधील निरीक्षकांची देखरेख

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याप्रमाणे ३० सप्टेंबर रोजी मतदार नोंदणीला सुरुवात झाली असून मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. परंतु यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी लोढा यांनी केली आहे.

आणखी वाचा-मुंबईतील ३५० बसगाडय़ांवर हवा शुद्धीकरण यंत्रे; पालिकेचा निर्णय, आणखी सहा उपाययोजना

महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि सुरू असलेली उपोषणे या सर्व कारणांमुळे इच्छुक मतदारांना, त्यांच्या नाव नोंदणीमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त मतदारांना नाव नोंदणी करता यावी याकरिता मतदार नाव नोंदणीसाठी देण्यात आलेल्या कालावधी वाढवावा, असे लोढा यांनी पत्रात नमुद केले आहे.