शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्रातील विधवा महिलांना ‘गंगा भागिरथी’ शब्द वापरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश प्रधान सचिवांना दिले. यामुळे विधवा महिलांचा सन्मान वाढेल, असा दावा मंत्री लोढा यांनी केला. यानंतर राज्यभरातून यावर प्रतिक्रिया येत आल्या. यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवारी (१३ एप्रिल) पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी पत्रकारांनी “महिलांचे आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्याऐवजी पर्यायी शब्द का?” असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव घेत प्रत्युत्तर दिलं.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विधवा शब्दाला पर्याय म्हणून पूर्णांगी, स्वयंसिद्धा, सक्षमा अशी तीन नावं सुचवली होती. अशी तीन नावं असताना गंगा भागिरथी हे नाव कोठून आलं? असा प्रश्न पत्रकारांनी मंगलप्रभात लोढा यांना विचारला. यावर मंत्री लोढा म्हणाले, “या नावाची सुचना देण्यात आली. विविध संघटनांनी हे नाव सुचवलं. ती नावं विभागात चर्चेसाठी पाठवली आहेत.”

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Kishore Jorgewar expressed his displeasure with Sudhir Mungantiwar front of Devendra Fadnavis
थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”
Supriya Sule asked why the investigative agencies are misusing power
सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांचा ससेमिरा कशासाठी; सुळे यांचा सवाल
What Nana Patole Said About Devendra Fadnavis ?
Nana Patole : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील? ते निवडून येणारच नाहीत..”; नाना पटोले काय म्हणाले?
Devendra Fadnavis , Ravi Rana, Mahavikas Aghadi,
विरोधकांच्या डोक्‍याचे नट कसण्‍यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!

“हा शब्द सुचवणं माझा पुढाकार नाही”

“हा शब्द सुचवणं माझा पुढाकार नाही. हा महिला आयोगाचा पुढाकार आहे. त्यांनी चार नावं सुचवली, आणखी काही लोकांनी चार नावं सुचवली. सर्व नावं मी विभागात पाठवले आणि चर्चा करण्यास सांगितले. त्यात काय चुकीचं आहे हे मला समजत नाही,” असं मत लोढा यांनी व्यक्त केलं.

“महिलांचे आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्याऐवजी पर्यायी शब्द का?”

महिलांचे आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्याऐवजी हा पर्यायी शब्द सुचवण्याचा प्रस्ताव कशासाठी? या प्रश्नावर लोढा म्हणाले, “सरकार महिलांच्या आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न करत आहे. या शब्दाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मंत्री म्हणून माझ्याकडे दररोज ५-१० पत्रं असतात. त्यातील जे व्हीआयपी पत्रं आहेत ते आम्ही नेहमीप्रमाणे विभागाकडे पाठवतो. त्यात आक्षेपार्ह काय आहे? ती नावं चर्चेसाठी पाठवली आहेत.”

“तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांना विचारा की…”

“तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांना विचारा की, त्यांनी कशासाठी विधवांचं नाव बदलण्यास सांगितलं. त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी पर्यायी नाव सुचवलं होतं. हा माझा पुढाकार नाही. रुपाली चाकणकर आणि आणखी काही संघटनांच्या सुचनांचे पत्र मी विभागाकडे पाठवले आहे. याबाबतच्या नावाचा प्रस्ताव येईल तेव्हा त्यावर काय करणार हे सांगू,” असंही लोढा यांनी नमूद केलं.

हेही वाचा : ‘गंगा भागीरथी’ म्हणत २१ व्या शतकातील महिलांना पुन्हा पुरातन काळात नेण्याचा प्रयत्न का?

“शब्दांचे पर्याय सुचवणारे संघटनांचे अर्ज आले”

मंगल प्रभात लोढा म्हणाले, “गंगा-भागिरथीसह ज्या शब्दांचे पर्याय सुचवणारे संघटनांचे अर्ज आले ते मी चर्चेसाठी महिला व बालविकास विभागाकडे पाठवले आहेत. याशिवाय काहीही झालेलं नाही. याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही किंवा शासन आदेशही काढण्यात आलेला नाही.”

“या शब्दावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही”

गंगा भागिरथी शब्दामुळे स्त्री-पुरुष समानतेला अडथळा निर्माण झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. याविषयी विचारलं असता लोढा म्हणाले, “या शब्दामुळे सुप्रिया सुळेंचं तसं म्हणणं असेल. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मला केवळ एक पत्र आलं होतं आणि ते मी चर्चेसाठी विभागाला पाठवलं आहे. यामुळे काय झालं आहे? याआधीही एक पत्र आलं होतं. तेही मी विभागाला पाठवलं होतं, हेही पत्र पाठवलं.”

काँग्रेसने लोढा पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे असा आरोप केला. यावर लोढांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.