अखेरच्या श्वासापर्यंत कविता जगणारे आणि इतरांनाही जगण्याचे नवे बळ देणारे दिवंगत कवी मंगेश पाडगावकर यांना ‘ललित’ मासिकाच्या मार्च महिन्याच्या अंकातून आदरांजली वाहण्यात आली आहे. मासिकाचा हा अंक ‘मंगेश पाडगावकर स्मृती विशेषांक’ म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे.
भावकविता, भावगीते, बालगीते, संगीतीका, नाटय़काव्य, गझल, वात्रटिका, सामाजिक उपरोधपर कविता, बोलगाणी आणि विडंबन अशा विविध साहित्य प्रकारातून पाडगावकर वाचकांना भेटले. पाडगावकरांच्या आयुष्यातील हे बारकावे आणि वेगळेपणा उलगडण्याचा प्रयत्न या स्मृती विशेषांकात करण्यात आला आहे. पाडगावकर यांचे कुटुंबीय, सहकारी, मित्र-परिवार यांनी पाडगावकर यांचे हे विविध पैलू आणि व्यक्तिमत्व विविध लेखांमधून उलगडले आहे.
आणखी वाचा