गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘कांतीलाल प्रतिष्ठान’ रायगड या संस्थेतर्फे पद्मभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. यानिमित्ताने त्यांची प्रकट मुलाखत जेष्ठ कवी अशोक बागवे घेणार असून पनवेल येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात ११ एप्रिलला सायंकाळी सहा वाजता हा सोहळा होणार आहे. यावेळी पाडगावकर आपल्या काही कवितांचे वाचनही करणार आहेत.
 हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे. या कार्यक्रमाचा मोठय़ा संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Story img Loader