कविवर्य मंगेश पाडगावकर यांना जाहीर झालेल्या पद्मभूषण पुरस्काराच्या निमित्ताने येत्या ९ फेब्रुवारी रोजी ‘कोमसाप’ने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पाचूच्या हिरव्या माहेरी’ या शीर्षकाअंतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमात पाडगावकर यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
दादर (पश्चिम) येथील अण्णासाहेब वर्तक सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या सोहोळ्यात ‘कोमसाप’चे विश्वस्त आणि सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांच्या हस्ते पाडगावकर यांचा सत्कार केला जाणार आहे. या प्रसंगी ‘कोमसाप’चे संस्थापक अध्यक्ष व राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सत्कार सोहोळ्यात पाडगावकर आपल्या काही निवडक कवितांचे वाचनही करणार आहेत.

Story img Loader