महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जत-खालापूर, पेण-सुधागड, अलिबाग-मुरुड या तालुक्यांचा समावेश असलेल्या मध्य रायगड जिल्हाध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष मनीष खवळे यांची आगामी एक वर्षांसाठी पुनश्च फेरनियुक्ती केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष तथा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज चव्हाण यांनी १७ नोव्हेंबर रोजी मनीष खवळे यांना फेरनियुक्तीचे पत्र देऊन खवळे यांचे अभिनंदन केले आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वाक्षरीचे फेरनियुक्ती पत्र पाहून मनस्वी आनंद झाला, अशी प्रतिक्रिया मनीष खवळे यांनी व्यक्त केली आहे. फेरनियुक्तीमुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे. तेव्हा पक्षाध्यक्ष व अन्य ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन पक्षाची ध्येयधोरणे राबविण्यासाठी व सर्व स्तरांतील क्षेत्रातील नागरिकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असा निर्वाळा त्यांनी दिला आहे. दरम्यान, जिल्हाध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्याबद्दल मनीष खवळे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा