दसरा मेळाव्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या झालेल्या अवमानावरून पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी शिवसेनेच्या नेतृत्वावर हल्ला करताना ‘शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या नेत्याचा असा अपमान होणे योग्य नाही’, असा सूर आळवला. मात्र त्यांच्या आधी शिवसेना सोडलेले सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी मनोहर जोशी यांनी जे पेरले तेच नियतीने त्यांच्या वाटय़ाला आणले, अशा शब्दांत मनोहर जोशी यांचा समाचार घेतला.
बळासाहेब असते तर त्यांनी असे होऊ दिलेच नसते. जोशी यांनी पूर्वीपासून शिवसेना वाढविण्यासाठी काम केले. शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या नेत्याचा असा अपमान होणे योग्य नाही. अशा घटनांमुळे पक्षनेतृत्वारील अन्य नेत्यांचाही विश्वास उडेल अशी टीका राणे यांनी केली. तर मनोहर जोशी यांनी जे पेरले तेच नियतीने त्यांच्या वाटय़ाला आणले असे छगन भुजबळ यांनी सांगितले. जोशी यांनी अशाचप्रकारे संघटनेतून अनेक चांगल्या नेत्यांना बाहेर घालविले. त्यामुळेच त्यांच्याही वाटय़ाला तोच अपमान आल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2013 रोजी प्रकाशित
राणेंना जोशींचा कळवळा!
दसरा मेळाव्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या झालेल्या अवमानावरून पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी

First published on: 16-10-2013 at 02:32 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manohar joshi has no political future says narayan rane