युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे परस्परांविरुद्धची माहिती आर. आर. पाटील यांना पुरवत असत, या अजित पवार यांच्या विधानावर मनोहर जोशी यांनी तीव्र आक्षेप घेतला असून पवार यांचा  निषेध केला आहे.
अजित पवार यांनी विधानसभेत आर. आर. पाटील यांच्या निधनाबद्दलच्या शोकप्रस्तावावरील भाषणात हा गौप्यस्फोट केला होता. अजित पवार यांचे हे वक्तव्य माझी व कै. गोपीनाथ मुंडे यांची बदनामी करणारे असून, शोक प्रस्तावावर बोलताना तसेच इतर वेळीही असत्य विधाने करणे हा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्वभावच आहे, अशा शब्दांत जोशी यांनी पवार यांची खिल्ली उडविली आहे.

Story img Loader