Maratha Protest in Mumbai : मराठा आरक्षणाचा लढा आता अधिक तीव्र होणार आहे. २० जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी गावातून मुंबईच्या दिशेने पायी मोर्चा काढणार आहेत. यानिमित्ताने मराठा समाज मुंबईत एकवटणार आहे. आंदोलन, मोर्चा आणि उपोषणासाठी हे मराठे बांधव मुंबईत दाखल होणार असल्याने त्यांच्या नियोजनाची जबाबदारी मुंबईत असणाऱ्या शिष्टमंडळाकडे आहे. त्यानुसार, त्यांनी आज (२९ डिसेंबर) आझाद मैदानावर पाहणी दौरा सुरू केला आहे. त्यानंतर शिष्टमंडळातील दोघांनी माध्यमांशी संवाद साधून पुढील दिशा कशी ठरवणार यावर सविस्तर माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“मुंबईच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे. मनोज जरांगेंचं स्वागत करण्याचं ठरलं आहे. आम्ही सर्व आझाद मैदान येथे रेकी करायला चाललो आहोत. मैदान बघायला चाललो आहे. त्यानंतर आमचं ठरेल की पुढील ग्राऊंड पाहायचे की नाही पाहायचे. मराठ्यांची संख्या सांगता येत नाही. आणि मराठ्यांची संख्या कधी मोजूही नये. कोट्यवधी मराठे येणार”, असं मनोज जरांगेंच्या शिष्टमंडळातील एका पदाधिकाऱ्याने माहिती दिली.

आम्ही ५८ मोर्चे पाहिले आहेत

“आमचा मोर्चा झाला होता तेव्हा आमची रंगीत तालिम झाली होती. आमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत. प्रत्येकाकडे पूर्वीप्रमाणेच जबाबदाऱ्या राहणार आहेत. आमची कुठेही गल्लत होईल असं काही वाटत नाही. येईल त्या मोहिमेला सामोरे जाणार आहोत. आम्ही ५८ व्या मोर्चामध्ये जे केलं होतं, तो डाटा आमच्याकडे आहे. ते कार्यकर्ते आमच्याकडे आहेत. आम्ही सर्व एकत्र आहोत. आणि एकत्रितपणे सगळं करू, त्यामध्ये आम्हाला कोणतीही समस्या येणार नाही. लाखो लोकांचे ५८ मोर्चे आम्ही सांभाळले आहेत”, असंही ते म्हणाले.

हेही वाचा >> दहा मुद्दे : जरांगेंच्या आंदोलनातून ‘जातिअंताच्या लढाई’चे भले होणार का?

प्रत्येकाला कामं वाटून दिली

आज संपूर्ण टीम आली आहे. आता संपूर्ण मैदानाची पाहणी करणार आहोत. जे योग्य मैदान योग्य वाटेल त्यावर मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून मैदान जाहीर करण्यात येईल. आंदोलनाचं नियोजन, परवानगीसाठी टीम तयार करून प्रत्येकाला कामे वाटून दिली जातील”, असं विरेंद्र पवार म्हणाले. विरेंद्र पवार हे मुंबईत मराठा आंदोलनाचं काम पाहतात.

नाहीतर विजयी सभा होईल

दरम्यान, मनोज जरांगे यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हाच शब्द दिला आहे. २० जानेवारीच्या आत आरक्षणाबाबत अंतिम निकाल घेतला जाईल, असं आश्वासन राज्य सरकारने दिलं आहे. यावर विरेंद्र पवार म्हणाले, “मनोज जरांगेंचं मुंबईत आगमन तर होणारच आहे. एकतर ते उपोषणासाठी असेल किंवा विजयी सभेत त्याचं रुपांतर होईल. मनोज दादांना उपोषणाची वेळ येऊ नये. राज्य सरकारने त्या आधी आरक्षण दिलं तर विजयी सभा होईल.”