राज्यात एकीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बची चर्चा असतानात दुरीकडे एटीएसनं मोठी कारवाई केली असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात २ जणांना अटक करण्यात आली आहे. आधी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे या दोघांना एटीएसनं अटक केली आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला होता. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या कारमुळे मनसुख हिरेन यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं गेलं आणि त्यांचाच संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. सध्या जिलेटिन कांड्या प्रकरणाची चौकशी एनआयएकडून सुरू असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडून सुरू आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा