पाच जणांचा बळी घेतलेल्या मंत्रालयातील आगीनंतर प्रशासनाचे मुख्यालय तीन महिन्यांत पूर्ववत केले जाईल, असा दावा राज्यकर्त्यांकडून केला गेला खरा पण उद्या या आगीला वर्ष पूर्ण होत असताना दुरुस्तीचे काम अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही. या आगीनंतर धडा घेऊन मंत्रालयाची रचनाच बदलण्यात येत असली तरी हे सारे काम कधी पूर्ण होईल याबाबत अनश्चितताच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडिओ – मंत्रालयाला लागलेल्या आगीची वर्षपूर्ती

चौथ्या मजल्यावर शॉट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील तीन मजले खाक झाले आणि मुख्यमंत्री कार्यालयातील दोन चोपदारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अनेक महत्त्वाच्या फाईल्स व कागदपत्रे जळून खाक झाली. आगीनंतर मंत्रालयाची इमारत पाडून नव्याने बांधायची की आहे त्याच इमारतीत सुधारणा करायची यावर बराच खल झाला. पाया भक्कम असल्याचा निर्वाळा दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या सर्वच तज्ज्ञांनी दिल्यावर मंत्रालयाची इमारत पाडायची नाही हा निर्णय झाला. पण दुरुस्तीचे काम कोणाला द्यायचे या चर्चेतच पाच महिने गेले. प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला नोव्हेंबरात सुरुवात झाली. यंत्रसामग्री आणण्याकरिता एक कॉलम तोडावा लागला. त्याला बळकटीकरण करण्यात दोन आठवडे गेले. दुरुस्ती करताना मंत्रालयाची रचना बदलण्यावर भर देतानाच त्याला ‘कॉर्पोरेट लूक’ देण्याचा प्रयत्न झाला. नव्या रचनेत ५० हजार चौरस फूट जागा वाढेल अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. काम सुरू झाल्यावर होणाऱ्या आवाजामुळे कर्मचारी हैराण झाले. अर्थसंकल्पाचे काम असल्याने आवाज कमी करा, असे फर्मान अजित पवार यांच्याकडील वित्त विभागाने सोडले आणि कामाची गती कमी झाली. रात्रीच्या वेळी काम केले तर शेजारील निवासी इमारतींमधील रहिवाशांनी आक्षेप घेतला. या साऱ्या गोंधळात आगीला वर्ष झाले तरी जळलेले मजले पूर्ववत होऊ शकलेले नाही.
जुलै अखेपर्यंत तीन मजले
आगग्रस्त मजल्यांची दुरुस्ती सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. १५ जुलैला चौथ्या किंवा पाचव्या मजल्यावरील कार्यालये सुरू होतील. जुलै अखेपर्यंत तिन्ही मजल्यांवरील काम पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. नव्या रचनेत जागा वाढली असून, लाकडी फर्निचर कमी करण्याबरोबरच ते कमी ज्वालाग्रही वापरण्यात आले आहे. आग विझविताना पाणीटंचाई जाणवल्यानेच साडेसात लाख लिटर्स पाण्याचा साठा करता येईल अशा टाक्या बांधल्या आहेत. प्रत्येक मजल्यावर आग लागल्यास पाण्याचा फवारा लगेचच सुरू होईल अशा पद्धतीने पाइप्स बसविण्यात आले आहेत.

संबंधित बातमी : सरकारी बंबही ‘सोमेश्वरी’च