मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली. मावळते मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती हे सोमवारी सेवानिवृत्त झाल्याने मुख्य सचिवपदासाठी सनदी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा होती. १९८६च्या तुकडीतील श्रीवास्तव आणि १९८७च्या तुकडीतील मनोज सौनिक या दोघांची नावे चर्चेत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठतेनुसार श्रीवास्तव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार सायंकाळी श्रीवास्तव यांनी मावळते मुख्य सचिव चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला. श्रीवास्तव हे एप्रिल २०२३ मध्ये सेवानिवृत्त होतील. श्रीवास्तव हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) या पदावर कार्यरत होते. यापूर्वी महसूल, नगरविकास या महत्वाच्या विभागांचे सचिव म्हणून काम केले आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नागपूरचे जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त, कोल्हापूर जिल्हाधिकारी आदी पदांवर त्यांनी काम केले आहे.
मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव
श्रीवास्तव यांनी मावळते मुख्य सचिव चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 01-03-2022 at 00:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manukumar srivastava is new chief secretary zws