मुंबई : नेहमीप्रमाणे मराठी कलाकारांनी आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीत अर्ज केले आहेत. अर्जदारांची प्रारूप यादी सोमवारी प्रसिद्ध झाली. ‘बिग बॉस सिझन ४’चा विजेता अक्षय केकळर, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्विक प्रताप, अभिनेत्री श्वेता खरात, योगिता चव्हाण, अश्विनी कासार यासह अनेक कलाकारांनी मुंबईतील घरांसाठी अर्ज केले आहेत.

मुंबईसारख्या महागड्या शहरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांपुढे म्हाडा हाच एकमेव पर्याय असतो. त्याप्रमाणे मराठी चित्रपट, मालिका क्षेत्रातील कलाकारांनाही म्हाडाचा पर्याय हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य वाटतो. त्यामुळे प्रत्येक सोडतीत कलाकार प्रवर्गात मोठ्या संख्येने कलाकार अर्ज करतात. आतापर्यंत म्हाडाच्या माध्यमातून अनेक मराठी कलाकारांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यंदाही मुंबईच्या सोडतीत कलाकारांनी अर्ज केले आहेत. त्यानुसार, बिग बॉस विजेता आणि सध्याचा ढोलकीच्या तालावर कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अक्षय केळकरने पहाडी गोरेगाव आणि मागाठाणेमधील घरांसाठी एकूण तीन अर्ज भरले आहेत. तर महाराष्ट्राची ‘हास्यजत्राफेम’ पृथ्विक प्रताप याने याआधी कोकण मंडळाच्या घरासाठी अर्ज केला होता. या घराचा ताबा मिळण्यास वेळ आहे. त्यामुळे त्याने मुंबईतही नशीब आजमावण्याकरिता मुंबईतील घरासाठी अर्ज केला आहे. गोरेगाव आणि विक्रोळीतील घरासाठी पृथ्विकने अर्ज केले आहेत.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
Rizwan Sajan Success Story
Success Story: १६ व्या वर्षी उदरनिर्वाहासाठी विकले दूध, आता आहेत दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”

हेही वाचा – मुंबई : एटीएम व्हॅनमधील रोकड लुटून चालकाचे पलायन

‘सावित्रीजोती’ आणि ‘गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेतील अभिनेत्री अश्विनी कासार, ‘जीव माझा गुंतला’मधील नायिका योगिता चव्हाण हिनेही घरासाठी अर्ज केला आहे. योगिताने कोकण मंडळातील घरासाठीही अर्ज केला होता. पण त्यात ती अयशस्वी ठरली. ‘रंग माझा वेगळा’मधील अभिनेत्री अनघा अतुल हिच्यासह अन्य कलाकारांनीही घरासाठी अर्ज दाखल केले आहेत.

हेही वाचा – मुंबई : रुग्ण बनून वरिष्ठ अधिकारी महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल, रुग्णालय प्रशासनाची तारांबळ

मुंबईत हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मलाही मुंबईत हक्काचे घर हवे आहे. परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. त्यामुळे मी गोरेगाव आणि मागाठाणेमधील घरासाठी अर्ज केला आहे. सध्या मी दहिसरला भाड्याच्या घरात रहातो आहे. त्यामुळे आता माझे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होते का ते लवकरच कळेल. – अक्षय केळकर

Story img Loader