अनेक आमदार, प्रमुख पक्षातील महत्वाचे नेते शिवसेनेच्या संपर्कात असून सर्वजण योग्य वेळेची वाट पाहत असून हळूहळू तुम्हाला दिसेल असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यात अनेक नामवंत नावंही आहेत असं ते म्हणाले आहेत. आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यावर बोलताना आशिष देशमुखांसारखे प्रमुख पक्षातील अनेक नाराज आमदार, नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर-ओवेसी यांच्या युतीवर बोलताना ही युती म्हणजे भाजपाची बी टीम असल्याचा टोला त्यांनी लगावला. दोघे एकत्र आल्यामुळे देशाच्या राजकारावर काय परिणाम होईल हे आत्ता सागू शकत नाही, मात्र ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी विसंगत युती असल्याचं ते म्हणाले आहेत. अशी युती आंबेडकरांना मान्य नसून त्याचा राजकीय लाभ होईल असं वाटत नाही असंही ते बोलले आहेत.

प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी एकत्र आल्याने निवडणूक जिंकू शकत नाहीत अशी टीका त्यांनी केली आहे. तसंच प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेसोबत यायला हवं होतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं. प्रकाश आंबेडकर एक हुशार राजकारणी आहेत. दलित नेत्यांमध्ये सर्वात बुद्धिमान नेते आहेत. ते योग्य पावलं टाकत असतात मात्र काही वेळा ती चुकीच्या दिशेने वळण घेतात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.