मुंबई : शहरातील अनेक समस्या नागरिकांच्या स्वयंशिस्तीच्या अभावी निर्माण झाल्या आहेत. नियमांचे पालन केल्यास त्या समस्या सहज सुटण्यासारख्या आहेत. वाहुतक कोंडी हे विकतचे दुखणे आहे, ते पोलीस तरी कसे दूर करणार? प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी पोलीस यंत्रणा कायम झटत असते, मात्र नागरिकांनीही त्यांच्या जबाबदारीचे भान राखावे, असे आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले. ‘लोकसत्ता’ आयोजित ‘शहरभान’ या उपक्रमांतर्गत त्यांनी बुधवारी नागरिकांशी संवाद साधला. महिला तसेच जेष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यास आपले प्राधान्य असल्याचेही ते म्हणाले.

विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात झालेल्या ‘लोकसत्ता शहरभान’ उपक्रमात फणसळकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सारस्वत को – ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या गौतम ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. वीणा वल्र्डच्या वैभवी सोमण, व्ही. एम. मुसळूणकर अँड सन्स ज्वेलर्स प्रा. लिमिटेडचे क्षितिज मुसळूणकर उपस्थित होते.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत

हेही वाचा >>> ‘जिंकेल त्याचा मतदारसंघ हे महाविकास आघाडीचे सूत्र’; संजय राऊत यांच्या वक्तव्याने काँग्रेस, राष्ट्रवादीत चलबिचल 

यावेळी फणसळकर म्हणाले, की महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य देत आहोत. त्यामुळे बलात्कार, विनयभंगसारख्या गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. शहरातील ११७ पैकी ११३ गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांमध्येही २८८ पैकी २८२ गुन्हे सोडवून आरोपीला अटक करण्यात आम्हाला यश आले आहे. हरवलेल्या व्यक्तीबाबतही मुंबई पोलीस दल संवेदनशील असून वर्षभरात ८ ते १० हजार व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कुटुंबीयांशी भेट घडवून आणल्याचे फणसळकर म्हणाले. मुंबई पोलिसांनी विशेष मोहिम राबवून साडे चार हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले. महापालिकेच्या मदतीने शहरातील २४०० बेकायदा पानटपऱ्यावर कारवाई केल्याचाही त्यांनी उल्लेख केला. गेल्यावर्षी मुंबईत ६८ हजार ९८९ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील ४८ हजार ३५६ गुन्हे सोडवण्यात आले. यावर्षी यात घट झाली असून १५ डिसेंबपर्यंत शहरात ४३ हजार २९ गुन्हे दाखल झाले आहेत. पुढच्यावर्षी त्यात आणखी सुधारणा करण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे फणसळकर म्हणाले.

लोकशाहीच्या पाश्चात्य प्रारूपामध्ये माणसांचा यंत्रणांशी संबंध हा पारपत्रापुरताच शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे आपण ज्या शहरात राहतो, त्या शहरातील यंत्रणांबाबत नागरिकांना अधिक माहिती मिळावी आणि ते शहराशी अधिक जोडले जावेत, यासाठी ‘शहरभान’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले. ‘लोकसत्ता’चे विकास महाडीक व रसिका मुळय़े यांनी संवाद साधला.

प्रायोजकत्व स्वीकारणार नाही

मुंबई पोलिसांना सरकारकडून मिळणारा निधी पुरेसा आहे. तो मिळण्याचा कालावधी मागे-पुढे होऊ शकतो. त्यामुळे पोलीस ठाण्यातील सुविधा, कर्मचाऱ्यांसाठी वस्तू असे कोणत्याही स्वरूपातील प्रायोजकत्व स्वीकारले जाणार नाही. तशी वेळही येणार नाही, असे फणसळकर मुलाखतीदरम्यान म्हणाले.

सायबर सुरक्षेसाठी जागरूकता महत्त्वाची

सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता असणे महत्त्वाचे आहे. अनोळखी व्यक्ती व मोबाईल क्रमांकाला प्रतिसाद न देऊच नये, असे आवाहनही फणसळकर यांनी केले. यंदा सायबर गुन्ह्यांतील २५ कोटी रुपये वाचवले आहेत. गुन्ह्याला बळी पडल्यास दोन तासांत तक्रार केल्यास परत मिळवता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.