मराठा समाजाच्या आरक्षणावरुन सध्या राज्याचं सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं आहे. २५ जुलैला झालेल्या मुंबई बंदनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आज सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोन्ही संघटनांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे. मराठा संघटनांनी केलेल्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाची शासकीय पुजा करणं टाळलं होतं. वारीदरम्यान आंदोलनकर्त्यांकडून वारकऱ्यांच्या गर्दीत साप सोडून घातपात घडवून आणण्याचा कट असल्याची माहिती तपासयंत्रणांनी आपल्याला दिली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य मराठा समाजाच्या भावना दुखवणारं असून, यासाठी त्यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. याचसोबत सरकारकडून आरक्षण देण्यासाठी उशीर होत असल्यामुळे, मुंबई बंद दरम्यान आंदोलनकर्त्यांना हातात दगड आणि काठी घ्यावी लागल्याचं मराठा समाजाच्या नेत्यांनी बंद मागे घेतल्यानंतर सांगितलं होतं. त्यामुळे या हिंसाचाराची नैतिक जबाबदारीही मुख्यमंत्र्यांचीच असल्याचं मराठा समाजाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान २५ जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये, ठाणे, कल्याण आणि मुंबईच्या काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते. यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांवर सरकारी मालमत्तेचं नुकसान आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या बंद दरम्यान आपल्या संघटनेतील कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं सांगत हे गुन्हे ताबडतोक मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. याचसोबत कळंबोली येथे पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज आणि गोळीबार याची चौकशी करुन, संबंधितांना तात्काळ निलंबीत करावं अशीही मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाने केलेली आहे.