मुंबईत मराठा समाजातील बांधवांनी त्यांच्या न्याय हक्कांसाठी गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा मोर्चा काढला आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात मोर्चाला सुरुवात झाली आहे. मराठा बांधवांचा मोर्चा निघणार हा व्हायरल मेसेज पोलिसांपर्यंत पोहचला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मरिन ड्राईव्ह परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला. आता हाच व्हायरल मेसेज खरा ठरला असून मराठा आंदोलक मोर्चासाठी गिरगाव चौपाटीवर एकत्र आलेत. गिरगाव चौपाटीपासून मोर्चाला सुरुवात झाली असून हा मोर्चा मुंख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या दिशेनं कूच करत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरही कडेकोट पोलीस
बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र तर्फे आज मुंबईत धडक मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चाला सुरुवात झाली असून मोर्चानं थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या दिशेनं कूच केली आहे. मोर्चा गिरगाव चौपाटीहून निघाला असून तो वर्षा बंगल्यावर जाणार आहे. त्यादरम्यानच्या रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
pune PMP is likely to increase ticket rates this year
पीएमपीचे तिकीट वाढणार, सर्वसामान्यांचा प्रवास होणार महाग ?
Manoj Jarange Patil
Manoj Jarange : जरांगे विरूद्ध फडणवीस संघर्ष पुन्हा पेटणार? शपथविधी होताच पाटलांचा राज्य सरकारला अल्टिमेटम, म्हणाले…

मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या काय?

आरक्षण हे मराठा म्हणूनच पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे, कायद्यात टिकणारं पाहिजे या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून हे आंदोलन केलं जात असल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे. हा मोर्चा गिरगाव चौपटी शहिद तुकाराम ओंबळे स्मारकापासून सुरू झाला असून थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यापर्यंत जाणार आहे. पण, या आंदोलनामुळे मराठा समाजात दोन मतं तर निर्माण झाली नाहीत ना? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

कारण काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटी जालना येथे आमदरण उपोषण केलं होतं. मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण द्या, यासह इतर मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. पण आता मराठा क्रांती मोर्चानं मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या, अशा मागणीसाठी आंदोलन सुरु केलं असून वर्षा निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला आहे.

Story img Loader