मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून त्यासंदर्भातील अध्यादेशही काढण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभर मराठा समाजाकडून गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरवून विजय साजरा केला जात आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात येऊन विजयाचा गुलाल उधळावा आणि आम्हाला भेटावे, अशी मागणी आझाद मैदानात एकवटलेल्या काही मराठा आंदोलकांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला होता. त्या अनुषंगाने राज्यभरातून बहुसंख्य मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सकाळी नवी मुंबईतील वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना अध्यादेशाची प्रत सुपूर्द केली. तसेच त्यांना फळांचा रस पाजून त्यांचे उपोषण सोडवले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर बहुसंख्य मराठा आंदोलक आपापल्या गाव-खेड्याकडे विजयाचा गुलाल उधळत आणि वाजत – गाजत निघाले. मात्र आंदोलनासाठी काही मराठा आंदोलकांनी चार ते पाच दिवसांपूर्वीच आझाद मैदान गाठले आणि व्यासपीठ उभारत इतर सर्व तयारीही केली. त्यामुळे आझाद मैदानातही मराठा आंदोलक गुलाल उधळून जल्लोष आहेत.

nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!

हेही वाचा…“शुद्धीवर आले तेव्हा तो माझ्यावर बलात्कार करत होता आणि..”, मुंबईतल्या २१ वर्षीय मुलीने पोस्ट करत सांगितली आपबिती

दरम्यान, मी दोन वेळा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लोणी काळभोर येथे उपोषण केले. तसेच सहा महिन्यांपासून पायात चप्पलही घातली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी एक चळवळ उभी केली होती. जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मी उद्याचा सूर्योदय पाहणार नाही, असे अण्णासाहेब पाटील यांनी सांगत स्वतःचा शब्द खरा करून दाखविला. मराठा आरक्षणाच्या लढ्यात आजवर अनेकांनी स्वतःचे बलिदान दिले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य नाही झाल्या तर मुंबईतील आझाद मैदानात जाऊन आमरण उपोषण करेन आणि जर मागण्या मान्य झाल्या तर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आझाद मैदानात येईन, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात यावे, आमची भेट घ्यावी आणि आमच्यासोबत विजयाचा जल्लोष करीत गुलाल उधळावा. तसेच अण्णासाहेब पाटील आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यात बलिदान देणाऱ्यांना श्रध्दांजली वाहावी, अशी मागणी लोणी काळभोर येथून आलेले मराठा क्रांती मोर्चाचे (महामुंबई) स्वयंसेवक सूर्यकांत काळभोर यांनी सांगितले.

हेही वाचा…“कुछ लोग जो ज्यादा जानते है इन्सान को कम पहचानते हैं..”, अमृता फडणवीसांनी पोस्ट केला गाण्याचा व्हिडीओ

मराठा समाजाच्या लढ्याला अखेर यश मिळाले असून आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आमरण उपोषणासाठी आम्ही चार दिवसांपूर्वीच आझाद मैदानात पोहोचलो आहोत. मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात येऊन विजयाचा गुलाल उधळणार असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी आझाद मैदानात येऊन विजयाचा गुलाल उधळावा. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्यांना ही खरी श्रद्धांजली ठरेल. मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या उपस्थितीत आझाद मैदानात विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आम्ही आतुर आहोत, असे लातूर येथून आलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य आणि मराठा आंदोलक समाधान ताई माने यांनी सांगितले.

Story img Loader