मुंबई : मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण आज, मंगळवारपासून होणार आहे. पुढील तीन दिवस हे सर्वेक्षण चालणार असून त्याची जबाबदारी महापालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. रुग्णालयांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही हे काम करावे लागणार असल्याने आरोग्य यंत्रणेवर परिणाम होण्याची भीती आहे. तसेच शिक्षण क्षेत्रालाही याचा फटका बसू शकतो.

हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाला नोटीस; ठाकरे गटाच्या याचिकेवर दोन आठवडयांनी सुनावणी

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी

२३ ते २५ जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षण चालणार असून त्यानंतर सलग तीन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे सहा दिवस प्रशासकीय कामकाजाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या केईएम, नायर, शीव, कूपर या वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच उपनगरीय रुग्णालयांतील ७५ टक्के कर्मचारी व अधिकारीही तीन दिवस सर्वेक्षणाचे काम करणार आहेत. त्यामुळे तीन दिवस रुग्णालयीन कामकाजावर परिणाम होणार आहे. त्यानंतर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी व त्यानंतर चौथा शनिवार व रविवार अशा सलग तीन दिवस सुट्टया आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या कामकाजावर अतिरिक्त ताण पडण्याची भीती रुग्णालय प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.

शिक्षण विभागावरही परिणाम

या सर्वेक्षणामध्ये मुंबई महापालिकेच्या विविध विभागांचे सहा हजारपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण विभागातील सर्वाधिक ३ हजार ५०० कर्मचाऱ्यांना या कामाला जुंपण्यात येणार असल्यामुळे महापालिका व त्यांच्याशी संलग्न शाळांतील बहुतांश शिक्षक सर्वेक्षणाच्या कामावर जातील. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सर्वेक्षणातील कर्मचाऱ्यांची संख्या

कार्यकारी आरोग्य अधिकारी – १५०

केईएम रुग्णालय – ९६

शीव रुग्णालय – ८०

नायर रुग्णालय – ७०

कूपर रुग्णालय – १५

नायर दंत रुग्णालय – २०

उपनगरीय रुग्णालये – ८०

राज्यात आजपासून मराठा सर्वेक्षण केले जाणार आहे. मुंबईत महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे काम देण्यात आले आहे. यामुळे रुग्णालये व शैक्षणिक कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.