आपल्या कलेतून नेहमीच वास्तवाचे चित्रण करणाऱ्या मराठी चित्रपटक्षेत्रातील कलाकारांनीही एकत्र येत होळी साजरी केली. अवधुत गुप्ते, वैभव मांगले, सुशांत शेलार, संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, स्वप्निल बांदेकर, जयवंत वाडकर, अरुण कदम असे अनेक कलाकार शिवाजी पार्क जवळील वनिता समाजच्या शेजारील मैदानात जमले होते. नाच आणि गाणी यांच्यासह रंग आणि पाणी यांची मुक्त उधळण करत या कलाकारांनी होळी साजरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतर वेळी आपल्या त्वचेबाबत खूपच जागरूक आणि संवेदनशील असलेले कलाकार रंगांची मुक्तपणे उधळण करीत होते. थंडाई, मिठाई आणि चाट यांचा आस्वाद घेत या सर्वानीच धुमशान केले. ‘आमच्या कलाकृतींमधून आम्ही सामाजिक भान जपण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. मात्र आमच्या उत्सवातूनही आम्ही ते भान जपले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही कलाकारांनी एक निधी जमवला आहे. हा निधी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे’, असे अवधुत गुप्ते याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actors aide to hailstrom victims