ठाणे येथील घोडबंदर भागात राहणाऱ्या सिनेअभिनेत्री अलका पुणेवार या गेल्या सात ते आठ दिवसांपासून बेपत्ता असून त्यांचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. खोपोली परिसरात त्यांची गाडी अपघातग्रस्त अवस्थेत सापडली. मात्र, त्यामध्ये कोणीच नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अलका यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ अजूनच वाढले आहे.
ठाणे येथील घोडबंदर भागात सिनेअभिनेत्री अलका पुणेवार या राहत असून २७ डिसेंबर रोजी त्या आणि त्यांचे पती संजय दोघे कोपरी भागात कारने आले होते. उरण येथील एका स्टेज शोसाठी त्यांना जायचे होते. त्यामुळे कोपरी परिसरात संजय यांनी त्यांना सोडले आणि ते घरी परतले. त्यावेळी कार अलका यांच्याकडे होती. त्यानंतर कारचा चालक आणि ग्रुपचे सहकारी आले असून त्यांच्यासोबत उरणला जात असल्याचे अलका यांनी संजय यांना मोबाइलवरून कळविले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी प्रसाद नावाच्या व्यक्तीने फोन केला होता. अलका या रागाच्या भरात कार घेऊन गेल्या असून त्यांचा मोबाइल नॉट रिचेबल येत आहे, असे त्याने सांगितले. मात्र हा फोन मध्येच डिस्कनेक्ट झाला. त्यामुळे अलका यांच्याविषयी संजय यांना फारशी माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अलका यांना फोन लावला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा