भाषा संवर्धक व भाषा अभ्यासक हे नवे पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ साहित्यिक व कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम आणि उपक्रमांतून मराठी भाषेचा जागर केला जाणार आहे. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दर वर्षी ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने राज्य शासनातर्फे मुंबईत प्रमुख सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या दिवशी राज्य वाङ्मय पुरस्कारांसह विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. यासह यंदाच्या वर्षांपासून मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक आणि डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.
भाजी विक्रीचा व्यवसाय करताना वाचनाची आवड जोपासणाऱ्या आणि वाचन संस्कृतीचे जतन व संवर्धन करणाऱ्या बेबीताई गायकवाड (औरंगाबाद) यांची ‘भाषा संवर्धक’ तर परदेशातून महाराष्ट्रात येऊन, मराठी भाषा शिकून व मराठी भाषेचा सखोल अभ्यास करणाऱ्या डॉ. मॅक्सीन बर्नसन यांची ‘भाषा अभ्यासक’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, वसई, औरंगाबाद, जळगाव, भुसावळ, सांगली, गडचिरोली आदी ठिकाणी संबंधित विद्यापीठांमध्ये तसेच काही महाविद्यालयातही व्याख्याने, चर्चा, परिसंवाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत. ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भाषातज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध जोशी, डॉ. पद्माकर पंडित, ‘ग्रंथसखा’चे श्याम जोशी, डॉ. सुधीर रसाळ, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, माधव जोशी, अरुण करमरकर, अरुण फडके आणि अन्य मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहितीही तावडे यांनी दिली.

तावडे यांच्याकडून घोषणा
मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली आणि मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती दिली. २७ फेब्रुवारी रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात राज्य वाङ्मय, विंदा जीवनगौरव, श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशक आणि नव्याने सुरू केलेल्या दोन या सर्व पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या वेळी संगीतकार व गायक कौशल इनामदार व प्रथितयश कलाकार ‘मराठीनामा’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. मराठी भाषेची स्थित्यंतरे या कार्यक्रमातून उलगडली जाणार आहेत. तसेच ग्रंथप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

Sanju Samson is unlikely to get a chance in the Indian team for Champions Trophy 2025 reports
Champions Trophy 2025 : ऋषभ पंत की संजू सॅमसन, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात कोणाला मिळणार संधी? घ्या जाणून
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Jasprit Bumrah Wins ICC Mens Player of the Month for December 2024 For exceptional performances in IND vs AUS test Series
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने पटकावला ICC चा खास पुरस्कार, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पाहिला गोलंदाज
Just tell Virat Kohli you have a match against Pakistan Shoaib Akhtar advice to India Champions Trophy vbm
Champions Trophy 2025 : ‘त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे…’, विराटला फॉर्ममध्ये आणण्यासाठी शोएब अख्तरने भारताला दिला खास मंत्र
Australia announce 15 members squad for Champions Trophy 2025 Pat Cummins as a Captain
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा १५ सदस्यीय संघ जाहीर! ‘हा’ स्टार खेळाडू करणार नेतृत्त्व
New Zealand announces 15 member squad led by Mitchell Santner for Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! केन विल्यमसन नव्हे तर ‘हा’ खेळाडू सांभाळणार धुरा
Indian cricket team to play warm up match in Dubai ahead of Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया दुबईत खेळणार सराव सामना?
प्रज्ञावंतांना ऊर्जा देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’चे नवे पर्व
Story img Loader