अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. मुंबई विभागात १,२५७ मतपत्रिका बनावट आढळल्याने निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रमुख निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रारंभापासून वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी मुंबईसह महाराष्ट्रात सुरू झाली. त्यावेळी मुंबई विभागात बनावट मतपत्रिका आढळल्याने तेथील मतमोजणी स्थगित करण्यात आली होती. याच कारणास्तव नाट्य परिषदेच्या इतर विभागांचे निकालही राखीव ठेवण्यात आले होते. ही निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी ‘उत्स्फूर्त’ आणि ‘नटराज’ या दोन्ही पॅनलने केली होती.
नाट्य परिषदेचे निवडणूक ‘महानाट्य’ अखेर रद्द
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.
First published on: 19-02-2013 at 08:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi drama council election cancelled