मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी आणि महायुती या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांसह इतरही अनेक पक्षांचे, अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रसिद्ध गायक नंदेश उमप हेही निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र असलेले नंदेश उमप यांच्या उमेदवारीमुळे ईशान्य मुंबई मतदार संघ चर्चेत आला आहे. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने नंदेश यांना उमेदवारी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबई : मालमत्ता कर थकवणाऱ्या शैक्षणिक संस्थेचे संगणक केंद्र टाळेबंद, मालाडमधील संस्थेवर कारवाई

लोकसभेच्या निवडणूकीसाठी येत्या २० मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे. मुंबईतील सहा मतदारसंघात अटीतटीची लढाई होणार आहे. पूर्व उपनगरांचा समावेश असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाने संजय दीना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुतीने मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. त्यातच या मतदार संघासाठी गेल्या आठवड्यात ३ मे रोजी प्रसिद्ध मराठी लोकगायक नंदेश उमप यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

हेही वाचा >>> आशा सेविका चार महिने मानधनापासून वंचित

प्रसिद्ध शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र म्हणून नंदेश यांची ओळख आहेच त्याचबरोबर ते स्वत:ही गायक असल्यामुळे त्यांचीही वेगळी ओळख आहे. मात्र आता कलेच्या क्षेत्रातून त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही यानिमित्ताने प्रवास सुरू केला आहे. याबाबत नंदेश उमप यांनी लोकसत्ताला सांगितले की, गाणे हा माझा श्वास आहे. ते सुरूच राहणार आहे. मात्र समाजातील उपेक्षितांसाठी आपल्याला संविधानिक मार्गातून काही करता आले तर त्याचा मला आनंद वाटेल. यामुळे ही निवडणूक लढवत आहे. कलाकारांचे प्रश्न, अपंगांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असेन. सध्या तरी समाज माध्यमांवरून प्रचाराला सुरूवात केली असून एक दोन दिवसात पक्षाच्या नियोजनाप्रमाणे प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात होईल असेही त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi folk singer nandesh umap files nomination from bsp in mumbai north east seat mumbai print news zws
Show comments