पशाचा चुराडा, महामंडळाला भरुदड;  यंत्रणा नसतानाही केवळ कोणाचा तरी फायदा करून दिल्याचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्थिक प्रगतीच्या नावाने बोंब असलेल्या एसटी महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘मराठी राजभाषा दिनाचा’ ‘गौरव’ करण्यात आल्याचा ढोल पिटला जात असतानाच चांगले लाखभर रुपये खर्चून तयार केलेली शेकडो पत्रके महामंडळाच्या कार्यालयात धूळ खात पडली आहेत. मात्र या अतिरिक्त पत्रकांच्या खर्चाचा ‘हिशेब’ घेण्याचे धारिष्टय़ कोणताही वरिष्ठ अधिकारी घेत नसल्याचे समोर आले आहे. याशिवाय या पत्रकांवर कुसुमाग्रजांचे छायाचित्र नावापुरतेच असल्याचे पाहायला मिळाल्याने ‘मराठी भाषा दिना’ खरा सन्मान करण्यात आला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या इतिहासात पहिल्यादाच कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी राजभाषा दिनाचा ‘गौरव’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त मराठीतील श्रेष्ठ कवींच्या कवितांतील निवडक ओळी पत्रक स्वरूपात प्रत्येक बस गाडीत चिकटवण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून जाहीर करण्यात आले.

त्यानुसार एसटी महामंडळाच्या ताफ्यातील १८ हजारांहून अधिक बस गाडय़ात, तर ५६८ बस स्थानकांत कविवर्य कुसुमाग्रजांसह वि. म. कुलकर्णी, सुरेश भट आणि फादर स्टिफन्स यांनी रचलेल्या कविता प्रदíशत करण्यात येणार असल्याचे पत्रकात ठळक स्वरूपात अधोरेखित करण्यात आले.

त्यानुसार दोन लाखांहून अधिक खर्च करून स्टिकर्स, मनोगत पत्रक, भित्तिपत्रके तयार करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ही पत्रके िभतीवर किंवा एसटीच्या डब्यात न चिकटवता कार्यालयातच धूळ खात पडली आल्याचे समोर आले आहे.

याबाबत एका अधिकाऱ्याला विचारले असता, एसटीकडे यंत्रणा नसतानाही केवळ कोणाचा तरी फायदा करून द्यायचा या उद्देशाने अतिरिक्त पत्रके छापण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. याचा भरुदडही महामंडळावर पडणार असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.

तर ‘मराठी भाषा दिना’चा टिळा लावून लाखो रुपयांच्या मदतीने त्यातून अप्रत्यक्षपणे स्वत:ची जाहिरात करून घेण्याचा प्रकार थांबला पाहिजे, असे मत ही त्यांनी नमूद केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi language day
Show comments