रसिका मुळ्ये
राज्यातील मराठी शाळा बंद होत असताना परदेशातील मराठीजनांनी मात्र मराठी भाषा शिक्षणावर भर दिला आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर यांसह अनेक देशांमध्ये आठवडय़ाला मराठी शाळा भरत असून त्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसादही वाढत आहे.
गेल्या काही वर्षांपासून पटसंख्येअभावी मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याची चर्चा राज्यात रंगली आहे. नव्याने सुरू होणाऱ्या शाळाही प्रामुख्याने इंग्रजी माध्यमाच्या आहेत. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांनीही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा घाट घातला आहे. राज्यात असे चित्र दिसत असताना दूरदेशी स्थायिक झालेल्या मराठीजनांमध्ये मात्र मराठी भाषा अभ्यासाचे महत्त्व वाढत आहे. मराठी भाषक आधिक्याने असलेल्या देशांमध्ये पुढील पिढीशी मराठीशी असलेली नाळ कायम जोडलेली राहावी यासाठी वर्षांनुवर्षे मराठी शाळा सुरू आहेत. दरवर्षी या शाळांमध्ये आणि त्याला मिळणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामध्ये भर पडत आहे.
प्रतिसाद वाढता
अमेरिकेत वेगवेगळ्या शहरांमध्ये सत्तरपेक्षा अधिक मराठी शाळा आहेत. शेकडो विद्यार्थी येथील काही शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. बृहन्महाराष्ट्र मंडळ या शाळांची व्यवस्था पाहते. कॅनडा येथे पंचवीस वर्षांपासून मराठी शाळा सुरू झाली आहे. टोरोंटो येथील मराठी शाळेलाही पालकांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये साधारण दहा वर्षांपूर्वी मराठी शाळा सुरू झाली. आता पालकांच्या मागणीमुळे सिडनीतच चार शाळा झाल्या आहेत. या शाळांमध्ये साधारण २० ते ७० विद्यार्थी शिक्षण घेतात. मेलबर्न, पर्थ, अॅडलेड येथेही शाळा सुरू झाल्या आहेत. सिंगापूर येथेही पाच वर्षांपूर्वी मराठी शाळा सुरू झाली आहे, त्यासाठीही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत असल्याचे मंडळाचे आशीष पुजारी यांनी सांगितले. त्याशिवाय दुबई, इस्राईल येथेही मराठी भाषाभ्यास केला जात आहे.
राजमान्यता.. अमेरिकेतील मराठी शाळांना आता ‘फॉरेन लँग्वेज स्कूल’ म्हणून दर्जा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियातील शाळांना इमारती, शिक्षक प्रशिक्षण या सुविधा स्थानिक प्रशासन देते. तसेच अनुदानही देते. ऑस्ट्रेलियामध्ये वैकल्पिक विषय म्हणून परदेशी भाषा शिकता येते. त्यात अद्याप मराठीचा समावेश नाही. सध्या सहावीपर्यंतचे वर्ग आहेत, दरवर्षी नवे वर्ग वाढत जातील त्यानुसार येत्या काही वर्षांत तेथे मराठी वैकल्पिक विषय म्हणून अभ्यासता येऊ शकेल, असे काशिद यांनी सांगितले.
स्वतंत्र अभ्यासक्रम, प्रशिक्षित शिक्षक
मराठी घरातील मुलांना मराठी भाषा शिकायची असली तरी त्यांचा भवताल, अनुभवांमधील फरक लक्षात घेऊन प्रत्येक देशातील शाळांनी आपापला स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. अमेरिका आणि कॅनडातील साधारण ४२ शाळांसाठी पुण्यातील भारती विद्यापीठाने अभ्यासक्रम तयार केला आहे. दरवर्षी विद्यापीठाकडून परीक्षाही घेण्यात येते. ऑस्ट्रेलियातील नियमांनुसार मुलांबरोबर काम करायचे असल्यास स्वतंत्र प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यानुसार या मराठी शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक आहेत. ‘व्यावहारिक मराठी शिकवण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर सण, संस्कृती, महान व्यक्ती, साहित्यिक यांची ओळख, महाराष्ट्रचा आणि देशाचा इतिहास यांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. मराठी शिकवताना स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन मुळाक्षरे आणि शब्दांची ओळख करून दिली जाते. म्हणजेच येथील मुलांना उखळ माहीत असणे शक्य नाही. अशा वेळी स्थानिक संदर्भाचा आधार घेण्यात येतो,’ अशी माहिती सिडनीतील एका शाळेचे समन्वयक संतोष काशिद यांनी दिली.
नव्या मुलांना सहकार्य
शालेय शिक्षणातील काही वर्षे भारतात आणि त्यानंतर परदेशी स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. अनेक देशातील शाळांमध्ये अशा मुलांना सामावून घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असली तरीही काही वेळा इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनाही विषय समजण्यास अडचण येते. अशा वेळी विषय समजावून देण्यातही मराठी शाळा सहकार्य करतात.
शाळा कशी?
* प्रत्येक देशाच्या शैक्षणिक धोरणानुसार इंग्रजी किंवा स्थानिक भाषेतील शाळा आणि आठवडय़ातून एकदा किंवा दोनदा भरणारी मराठी शाळा अशा दोन्ही शाळांमध्ये विद्यार्थी हजेरी लावतात.
* प्रत्येक इयत्तेनुसार विद्यार्थ्यांचे स्वतंत्र वर्ग, प्रशिक्षित शिक्षक या शाळांमध्ये आहेत. मराठी पुस्तकांची वाचनालयेही आहेत. बहुतेक शाळांची जबाबदारी तेथील मराठी मंडळांनी घेतली आहे. स्थानिक शैक्षणिक वर्षांनुसारच या शाळांचेही वार्षिक शैक्षणिक वेळापत्रक असते.
* करोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या या शाळाही ऑनलाइनच भरत आहेत. सिडनी येथील शाळांमध्ये ७ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आहेत.