मराठी टायपिंगमध्ये दहापट वाढ
मराठी शाळांमधील विद्यार्थिसंख्या घटत असली तरी मराठी भाषाभिमान मात्र फोफावत असल्याचे मोबाइल वापरकर्त्यांच्या मराठीतून टंकण्याच्या वाढत्या सवयींमधून लक्षात येत आहे. इंग्रजी किंवा मिंग्लिश भाषेत मोबाइलवर संदेशवहन करणारी तरुणाई आता जोमाने मराठीत टाइप करू लागली आहे. एका पाहणीनुसार मोबाइलवर मराठी टायपिंगचे प्रमाण एक-दोन नव्हे, तर चक्क दहा पटींनी वाढल्याचे लक्षात आले आहे.
मराठी अॅप्समध्ये आलेली सुलभता मोबाइलच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर मराठीतून व्यक्त होण्यास प्रवृत्त करत असल्याचे निरीक्षण संगणकतज्ज्ञ माधव शिरवळकर यांनी नोंदविले. ठरावीक साच्यातील कळफलक उपलब्ध असल्यामुळे अनेक जण मराठी टाइप करण्यास धजावत नव्हते. मात्र आता कळफलकाचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. यामुळे मोबाइलवर मराठीला सुगीचे दिवस आल्याचेही ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा