मुंबई आणि आसपासच्या परिसराला पावसाने झोडपून काढले असले तरी मराठवाडा आणि विदर्भ अद्यापही कोरडेच आहेत. या दोन्ही विभागांमध्ये सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाला असून, जलाशयांमधील साठाही वाढलेला नाही. तुलनेत कोकण आणि पुणे विभागातील जलाशयांमध्ये साठा समाधानकारक झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या आठवडय़ात शुक्रवारपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई, ठाणे, बदलापूर परिसराला पावसाने झोडपून काढले. बदलापूर परिसरात तर पाण्याने हाहाकार माजला. कोकण पट्टा आणि मुंबईत आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. कोकण आणि मुंबईतील जलाशयांमध्ये पाणीसाठाही समाधानकारक झाला. विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांमध्ये मात्र आतापर्यंत अत्यंत कमी पाऊस झाला. मराठवाडय़ातील पाण्याचा साठा ०.८१ टक्के आहे. म्हणजेच एक टक्काही पाणीसाठा जुलै महिना सरत आला तरी झालेला नाही. गत वर्षी जुलैअखेर मराठवाडय़ातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या १८ टक्के पाणीसाठा होता. यंदा विदर्भातील नागपूर आणि अमरावती या दोन विभागांमध्ये कमी पाऊस झाला आहे. विदर्भातील जलाशयांमध्ये जेमतेम १० टक्केपाण्याचा साठा झाला आहे.

मराठवाडय़ातील जायकवाडीमध्ये अजूनही शून्य टक्के साठा आहे. गतवर्षी याच दिवशी ३१ टक्के पाण्याचा साठा झाला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणारे भातसा धरण हे ८५ टक्के भरले आहे. कोयनामध्ये ६० टक्के साठा झाला असला तरी सोलापूरमधील उजनी कोरडेठाक आहे. ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवीमध्ये ९५ टक्के साठा रविवारी झाला होता.

जिल्हानिहाय आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी. प्रत्येक जिल्ह्य़ाची सरासरी निश्चित केली जाते.

या आधारे कृषी विभागाने टक्केवारी काढली आहे.

कोकण : ठाणे (१३२), रायगड (११२), रत्नागिरी (१०५, सिंधुदुर्ग (८९), पालघर (११६)

पुणे : पुणे (१३२), सोलापूर (७१.७), सातारा (११७.३), सांगली (१३६), कोल्हापूर (७३)

नाशिक : नाशिक (८२.५), धुळे (८३.७), नंदुरबार (७६.५), जळगाव (९१.६), नगर (११२) मराठवाडा : औरंगाबाद (६० टक्के), जालना (८७), बीड (५५), लातूर (५२.३), उस्मानाबाद (५८.४), नांदेड (६८.३), परभणी (६०), हिंगोली (६०)

नागपूर : वर्धा (६१), नागपूर (७५), भंडारा (६२), गोंदिया (६४), चंद्रपूर (७३), गडचिरोली (६३)

अमरावती : बुलढाणा (९०), अकोला (६५), वाशिम (६०), अमरावती (७०), यवतमाळ (६०)

जलाशयांमधील साठा

कोकण : ८०.७७ टक्के

अमरावती : ९.५८ टक्के

नागपूर : १०.६७ टक्के

नाशिक : २६.८१ टक्के

पुणे : ५०.१८ टक्के