मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबई महानगरपालिका शिक्षण शिक्षकेतर सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून महानगरपालिका शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात करी रोड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयावर शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील खाजगी अनुदानित शाळेतील रिक्त जागांवर शिक्षक, लिपिक आणि शिपाई वर्गाची नेमणूक करणे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी डी. सी – १ योजना सुरू करणे आणि त्यांच्यासाठी विमा योजना लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ग्रांट इन कोड नियम लागू करणे, खाजगी अनुदानित शाळांना अनुदान देणे, खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकांना टीएसए – २७ टक्के देय देणे, खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांना तात्काळ परवानगी देणे, २०१५ पासून कार्यरत टी. ई. टी शिक्षकांना कर्मचारी संकेतांक देणे, शिक्षक कर्मचाऱ्यांचे दावे प्रलंबित असल्यास त्यांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम तात्काळ देणे आदी विविध मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका शिक्षण शक्षकेतर सेनेने महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका शिक्षण शिक्षकेतर सेनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

The Meteorological Department has predicted light rain in Mumbai news
मुंबईत हलक्या सरींची शक्यता
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
4th special admission list for 11th admission in Mumbai metropolitan area announced Mumbai news
अकरावी प्रवेश: चौथी विशेष प्रवेश यादी जाहीर; ४ हजार ७७१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
The accused in the case of kidnapping and murder of a 12 year old boy from Wadala was arrested Mumbai news
वडाळ्यातील १२ वर्षांच्या मुलाच्या अपहरण व हत्याप्रकरणातील आरोपीला अटक
Looting jewelery from a house in Kandivali West crime news Mumbai news
मुंबईः घरात शिरलेल्या दोघांनी महिला बांधून दागिने लुटले
Malvan Shivaji Maharaj statue collapse case in High Court Mumbai news
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण उच्च न्यायालयात; पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
The accused who molested a 13 year old girl in Dahisar area was arrested from Uttar Pradesh Mumbai news
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक; एमएचबी कॉलनी पोलिसांची कारवाई