नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड, ठाणे जिल्ह्य़ांतील सिडको प्रकल्पग्रस्त सोमवारी बेलापूर येथील सिडको भवनवर धडक मोर्चा काढणार आहेत. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते एकत्र आले असून प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासाठी सिडको बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे.
सिडकोने वेळीच गावठाण विस्तार योजना न राबविल्याने प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली सर्व घरे विनाअट कायम करण्यात यावी, सिडकोतील नोकरभरतीत प्रकल्पग्रस्तांना पूर्णपणे स्थान देण्यात यावे, साडेबारा टक्के योजनेचे वाटप त्वरित पूर्ण करावे, गावांना प्राथमिक सुविधा देण्यात याव्यात, नवी मुंबई एसईझेडकरिता घेतलेल्या जमिनी प्रकल्पग्रस्तांना परत देण्यात याव्यात, न्हावा शेवा येथील सागरी पूल बांधण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात याव्यात आणि सिडकोतील भ्रष्ट अधिकाऱ्यांची सीबीआयतर्फे चौकशी करण्यात यावी, या मागण्यासाठी आज (११ फेब्रुवारी) सकाळी सिडकोच्या बेलापूर येथील मुख्यालयावर हजारो प्रकल्पग्रस्त धडकणार आहेत.
प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनात आमदार विवेक पाटील, प्रशांत ठाकूर, शेकापचे सरचिटणीस बाळाराम पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, कामगार नेते श्याम म्हात्रे सहभागी होणार आहेत.
सिडकोवर प्रकल्पग्रस्तांचा आज धडक मोर्चा
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड, ठाणे जिल्ह्य़ांतील सिडको प्रकल्पग्रस्त सोमवारी बेलापूर येथील सिडको भवनवर धडक मोर्चा काढणार आहेत.
First published on: 11-02-2013 at 02:52 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: March today on cidco of project affected