नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड, ठाणे जिल्ह्य़ांतील सिडको प्रकल्पग्रस्त सोमवारी बेलापूर येथील सिडको भवनवर धडक मोर्चा काढणार आहेत. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते एकत्र आले असून प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासाठी सिडको बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे.
सिडकोने वेळीच गावठाण विस्तार योजना न राबविल्याने प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली सर्व घरे विनाअट कायम करण्यात यावी, सिडकोतील नोकरभरतीत प्रकल्पग्रस्तांना पूर्णपणे स्थान देण्यात यावे, साडेबारा टक्के योजनेचे वाटप त्वरित पूर्ण करावे, गावांना प्राथमिक सुविधा देण्यात याव्यात, नवी मुंबई एसईझेडकरिता घेतलेल्या जमिनी प्रकल्पग्रस्तांना परत देण्यात याव्यात, न्हावा शेवा येथील सागरी पूल बांधण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात याव्यात आणि सिडकोतील भ्रष्ट अधिकाऱ्यांची सीबीआयतर्फे चौकशी करण्यात यावी, या मागण्यासाठी आज (११ फेब्रुवारी) सकाळी सिडकोच्या बेलापूर येथील मुख्यालयावर हजारो प्रकल्पग्रस्त धडकणार आहेत.
प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनात आमदार विवेक पाटील, प्रशांत ठाकूर, शेकापचे सरचिटणीस बाळाराम पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, कामगार नेते श्याम म्हात्रे सहभागी होणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा