मुंबई : सध्याच्या स्पर्धात्मक काळात विविध टप्प्यांवर बदलत गेलेल्या करिअरच्या संधींचा भविष्यवेध घेणारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही कार्यशाळा मुंबईनंतर ठाण्यातही आयोजित करण्यात आली आहे. ठाणे पश्चिमेकडील एल बी एस मार्गावरील हॉटेल टीप टॉप प्लाझा येथे ८ व ९ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही कार्यशाळा होईल. शैक्षणिक प्रवासातील विशिष्ट टप्प्यांनंतर पुढे काय करायचे, नवनवीन अभ्यासक्रम व सदर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया कशी आहे, याबाबत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तर ‘नव्या वाटा’ या सत्राअंतर्गत युट्यूब – समाजमाध्यमे, वित्तक्षेत्रातील संधी आणि एआय – कृत्रिम बुद्धिमत्तेचे जग विद्यार्थ्यांना जाणून घेता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलत्या काळानुसार युट्यूब व समाजमाध्यमे ही तरुणाईसह अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत. परंतु युट्यूब – समाजमाध्यमांमध्ये आजची तरुणाई गुंतत चालली आहे. समाजमाध्यमांमध्ये रोजगाराच्या संधी व आर्थिक गणिते कशी आहेत, याबाबत केतन जोशी मार्गदर्शन करणार आहेत. भारतातील बँकिंग वित्त क्षेत्राचा मोठा विस्तार होऊन सध्या गुंतवणूक विषयक उत्पादने समजून घेऊन सल्ला देणे, वित्तीय सेवांची विक्री करणे, शेअर बाजाराशी संबंधित कंपन्यांमध्ये सल्लागार म्हणून काम करणे, असे अनेक रोजगार पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये कशी संपादन करायची? नेमकी कोणती कौशल्ये असायला हवीत? याविषयी अर्थ अभ्यासक आणि गुंतवणूक मार्गदर्शक कौस्तुभ जोशी मार्गदर्शन करणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाबद्दल अनेकांमध्ये कुतूहल असण्यासह भविष्यात नोकऱ्या जाण्याची भीतीही आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे जग नेमके कसे आहे? या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल? फायदे व तोटे, याबाबत डॉ. भूषण केळकर संवाद साधतील.

हेही वाचा : मध्य रेल्वेच्या ब्लॉकला सर्व स्तरातून विरोध

विद्यार्थीदशेत वावरताना ताणतणावाचे नियोजन कसे करावे आणि विद्यार्थी व पालकांचे नाते घट्ट होऊन कसा मनमोकळा संवाद कसा विकसित करावा याबाबत ८ जून रोजी डॉ. हरीश शेट्टी व ९ जून रोजी डॉ. राजेंद्र बर्वे मार्गदर्शन करतील. नवनवीन अभ्यासक्रम व विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींची ओळख विवेक वेलणकर करून देणार आहेत. कौशल्य विकास आणि त्यामधील विविध संधींबाबत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे प्रतिनिधी पंकज तावडे मार्गदर्शन करतील. तर परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींबाबत बख्तावर कृष्णन व तरंग अग्रवाल मार्गदर्शन करणार आहेत.

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत दोन्ही दिवस सारख्याच विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवसाची निवड करू शकतात. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रवेश शुल्क अवघे ५० रुपये आहे.

हेही वाचा : विक्रोळीत इमारतीचे छत कोसळून दोन वृद्ध इसमांचा मृत्यू

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शंकानिरसनाची संधी

कधी ?
शनिवार, ८ जून आणि रविवार, ९ जून रोजी
कुठे ?
हॉटेल टीप टॉप प्लाझा, एल बी एस मार्ग, ठाणे (पश्चिम)
केव्हा ?
सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत

ऑनलाइन पद्धतीने प्रवेश आरक्षित करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या

८ जून : http://tiny.cc/LS_MargYashacha_8june
९ जून : http://tiny.cc/LS_MargYashacha_9june

हेही वाचा : आज सीएसएमटी ते दादर, वडाळा लोकल बंद

मुख्य प्रायोजक – आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड

सहप्रायोजक – सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, द सिव्हिलियन्स अकॅडमी, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, सिंहगड इन्स्टिट्यूट्स, लीला एज्युकेशन सोसायटी आचार्य इन्स्टिट्यूशन्स

बँकिंग पार्टनर – युनियन बँक ऑफ इंडिया

पॉवर्ड बाय – ज्ञानदीप अकॅडमी फॉर यू.पी.एस.सी. अँड एम.पी.एस.सी., पुणे , एस आर एम युनिव्हर्सिटी, एपी, मंथन आर्ट स्कूल, भारत कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कान्होर, बदलापूर (प.), विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, शौर्य डिफेन्स अकॅडमी, ठाणे , इंदाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marg yashacha event at thane on opportunities in social media ai and finance sector css