दहावी आणि बारावी या दोन महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यांवर प्रत्येक विद्यार्थ्यांला तज्ज्ञ मार्गदर्शनाची अत्यंत निकड भासते. असे मार्गदर्शन प्रत्येकाला सहजतेने मिळतेच, असे नाही. त्याचसाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘लोकसत्ता- मार्ग यशाचा’ या उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. या गुरुवारी आणि शुक्रवारी या उपक्रमाचा लाभ ठाण्यातील विद्यार्थी आणि पालकांना मिळणार आहे.
ठाणे पश्चिम येथील टिपटॉप प्लाझा येथे विद्यालंकार प्रस्तुत आणि आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्सच्या सहकार्याने हा परिसंवाद होणार आहे.   परिसंवादाच्या सुरुवातीच्या सत्रात पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या करिअरविषयक विभागाच्या प्रमुख नीलिमा आपटे यांचे ‘करिअर निवडताना..’ या विषयावर मार्गदर्शन होईल. त्यानंतर कॉर्पोरेट ट्रेनर गौरी खेर यांचे ‘सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व आणि विकास’ हे व्याख्यान होईल. त्यानंतर ‘दहावी-बारावीनंतरचे अभ्यासक्रम आणि करिअर संधी’ या विषयावर ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर मार्गदर्शन करतील. परिसंवादासोबतच शैक्षणिक प्रदर्शनही होणार असून डोंबिवली नागरी सहकारी बँक या कार्यक्रमाची ‘बँकिंग पार्टनर’ आहे.
दोन्ही दिवशी वक्ते आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय सारखाच असेल. यांपैकी कुठल्याही एका दिवशी उपस्थित राहण्यासाठी प्रतिव्यक्ती ५० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाईल. यात उपस्थितांना दुपारचा लंच बॉक्सही दिला जाईल.

कार्यक्रमाच्या प्रवेशिका पुढील ठिकाणी ऑनलाइन बुकिंगसाठी ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

* कधी?
गुरुवार आणि शुक्रवार
सकाळी ९ ते सायंकाळी ५
कुठे ?
टिपटॉप प्लाझा, ठाणे पश्चिम
उद्घाटन
ठाणे जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते

Story img Loader