मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षांनंतर करिअरच्या पुढील पायरीवर उभे असताना नेमकी कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करावी, प्रवेश प्रक्रिया कशी असेल, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम असतो. या दरम्यान भविष्यातील करिअरच्या संधींबाबतही चिंता सतावू लागते आणि करिअर निवडीची दिशा सुस्पष्ट करणाऱ्या माध्यमाची विद्यार्थ्यांना गरज भासते. हेच माध्यम ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. या कार्यशाळेला मुंबईत उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर येत्या ८ व ९ जून रोजी ही कार्यशाळा ठाण्यात होणार आहे. ठाणे पश्चिमेकडील एल बी एस मार्गावरील हॉटेल टीप टॉप प्लाझा येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही कार्यशाळा होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसह इतर उच्च शिक्षणाच्या संधी कोणत्या? याबाबत थेट तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थीदशेत वावरत असताना परीक्षा, निकाल, प्रवेश प्रक्रिया आणि नवीन अभ्यासक्रमाबाबत काहीसे दडपण असते. या ‘ताणतणावाचे नियोजन’ कसे करावे त्याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. ‘नव्या वाटा’ या सत्रात युट्यूब – समाजमाध्यमे, वित्तक्षेत्रातील संधी आणि एआय – कृत्रिम बुद्धिमत्तेचे जग, ‘नवनवीन अभ्यासक्रम व विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी’, ‘कौशल्य विकास’ क्षेत्रातील अभ्यासक्रम व करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, ‘परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी’, कला क्षेत्रापासून विधी क्षेत्रांपर्यंत कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आदी विषयांबाबत इत्यंभूत माहिती या कार्यशाळेत मिळू शकेल.

हेही वाचा : मध्य रेल्वेवरील ९३० लोकल फेऱ्या रद्द, ३३ लाख प्रवाशांचे अतोनात हाल; ठाण्याला ६३ तासांचा, सीएसएमटीकडे ३६ तासांचा ब्लाॅक

विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत दोन्ही दिवस सारख्याच विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवसाची निवड करू शकतात. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रवेश शुल्क अवघे ५० रुपये असेल.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शंकानिरसनाची संधी

कधी ?

शनिवार, ८ जून आणि रविवार, ९ जून रोजी

कुठे ?

हॉटेल टीप टॉप प्लाझा, एल बी एस मार्ग, ठाणे (पश्चिम)

केव्हा ?

सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत

हेही वाचा : पुणे अपघात प्रकरण : समितीचा अहवाल सादर; डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांचे निलंबन तर डॉ. विनायक काळे यांना सक्तीची रजा

ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका आरक्षित करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या

८ जून : http://tiny.cc/LS_MargYashacha_8june

९ जून : http://tiny.cc/LS_MargYashacha_9june

मुख्य प्रायोजक – आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड

सहप्रायोजक – सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, द सिव्हिलियन्स अकॅडमी, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, सिंहगड इन्स्टिट्यूट्स, लीला एज्युकेशन सोसायटी आचार्य इन्स्टिट्यूशन्स

बँकिंग पार्टनर – युनियन बँक ऑफ इंडिया

पॉवर्ड बाय – ज्ञानदीप अकॅडमी फॉर यू.पी.एस.सी. अँड एम.पी.एस.सी., पुणे , एस आर एम युनिव्हर्सिटी, एपी, मंथन आर्ट स्कूल, भारत कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कान्होर, बदलापूर (प.), विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, शौर्य डिफेन्स अकॅडमी, ठाणे , इंदाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marg yashacha event in thane on 8th and 9th june career guidance to 10th and 12th pass students mumbai print news css