लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेद्वारे पनवेल ते मडगाव दरम्यान अतिरिक्त दोन गणशोत्सव विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहेत.परतीचा प्रवास करताना रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पनवेल ते मडगाव दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०१४२८ विशेष रेल्वेगाडी १५ सप्टेंबर रोजी मडगाव येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याचदिवशी रात्री १०.१५ वाजता पोहोचेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाडी क्रमांक ०१४२७ विशेष रेल्वेगाडी १५ सप्टेंबर रोजी पनवेल येथून रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचेल. या गाडीला पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी येथे थांबे देण्यात येतील. या रेल्वेगाडीचा एक द्वितीय वातानुकूलित डबा, तीन तृतीय वातानुकूलित डबे, दोन तृतीय इकॉनॉमी वातानुकूलित डबे, आठ शयनयान, पाच सामान्य द्वितीय श्रेणी (१ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह) आणि एक जनरेटर कार अशी संरचना असेल. या गाडीचे आरक्षण विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेस्थळावर १० सप्टेंबर रोजी सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Margaon to panvel special trains for return journey to konkankars mumbai print news amy