लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : नववर्षांच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या पार्ट्यांसाठी मोठ्याप्रमाणात अमलीपदार्थांची तस्करी होण्याची शक्यता लक्षात घेता सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावरील संशयीत प्रवाशांवर करडी नजर ठेऊन होते. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात मुंबई विमानतळावरून ११५ कोटी ५० लाख रुपयांचे हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. सीमाशुल्क विभागाने २५ व २६ डिसेंबर रोजी मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत पाच प्रवाशांना २६ किलो गांजासह पकडले. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत २६ कोटी ४८ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

third party organizations will do scrap disposal appointment of three organizations after tender process
त्रयस्थ संस्थांकडे भंगार विल्हेवाट, निविदा प्रक्रियेअंती तीन संस्थांची नियुक्ती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस
bus station in Kurla, commuters problem Kurla,
कुर्ल्यातील बस स्थानक बंद केल्याने प्रवाशांना पायपीट
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी

सीमाशुल्क विभागाने २५-२६ डिसेंबरला गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून पाच प्रवाशांना अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश आहे. खाण्याचे पदार्थ (चिप्स), कपडे धुण्याचा साबण, डायपर आणि न्यूडल्सच्या पाकिटांमध्ये गांजा लपवण्यात आला होता. त्यांच्याकडून एकूण २६ किलो ४८१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत २६ कोटी ४८ लाख रुपये आहे. आरोपी बँकॉकहून गांजा घेऊन मुंबईत आले होते. गेल्या तीन महिन्यांत सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर केलेल्या विविध कारवायांमध्ये ११५ किलो ५०० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. त्याची किंमत ११५ कोटी ५० लाख रुपये आहे.

आणखी वाचा-राज्यातील विद्यापीठांतील भरती एमपीएससीऐवजी विद्यापीठांतर्गत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

सातारा, गुजरात, केरळमधील तरूणांचा समावेश, एका महिलेलाही अटक

सीमाशुल्क विभागाने २५-२६ डिसेंबरला पाच कारवाया करून २६ कोटी रुपये किमतीचा गांजा जप्त केला. पहिल्या कारवाईत गुजरातमधील रहिवासी असलेल्या भरतकुमार नायी (३६) याच्याकडून ४९४७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत अक्षय वाला(२९) या प्रवाशाकडून ४९४७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आले आहे. अक्षय हा देखील गुजरातमधील रहिवासी आहे. तिसऱ्या कारवाईत साताऱयात राहणाऱ्या सनी पाटील याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ११ किलो ९५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत सुमारे १२ कोटी रुपये आहे. चौथ्या कारवाईत केरळयेथील रहिवासी असलेल्या शफीउल्ला पूलेनकुन्नन याच्याकडून ३८८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत तीन कोटी ८८ लाख रुपये आहे. पाचव्या कारवाईत आशियाबानू शेख(३२) या महिलेला ७४८ ग्रॅम गांजासह अटक केली. त्याची किंमत ७४ लाख ८० हजार रुपये आहे. आरोपींविरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader