*  ठाण्यात एकाचा, वेंगुर्ल्यात दोघांचा मृत्यू
*  सदाशिव अमरापूरकर यांना धक्काबुक्की
यंदाची धुळवळ बिनपाण्याने साजरी करून राज्यातील असंख्य नागरिक बुधवारी दुष्काळग्रस्तांप्रतिच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय देत असतानाच काही ठिकाणी मात्र पाण्याची मोठय़ा प्रमाणावर नासाडी करून शिमगा साजरा करण्यात आला. डोंबिवलीसारख्या सुसंस्कृतांच्या नगरीतही ही असंस्कृतता दिसून आली. वर्सोव्यात तर पाण्याची नासाडी रोखण्याचे आवाहन करणारे ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना काही धनदांडग्यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. होळीच्या या सणाला अपघातांचेही गालबोट लागले. ठाण्यातील तलावात एका तरुणाचा, तर वेंगुर्ल्याच्या कोंडुरा समुद्रात दोघा जणांचा बुडून मृत्यू झाला.देशभरात २८ जणांचा बुडून मृत्यू झाला.जोगेश्वरी येथे फुगा लागल्याने लोकलच्या दरवाजात उभा असलेला एक प्रवासी जखमी झाला.      

राज्यभरातील पाण्याच्या टंचाईची अवस्था पाहता बुधवारची रंगपंचमी साजरी करताना  पाण्याची नासाडी टाळण्याकडे  मुंबईमधील लोकांचा कल अधिक होता. मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत नागरिकांकडून फक्त रंगांची उधळण करण्यात आली.

Story img Loader