मंगळ आणि शनी हे दोन ग्रह पुढील आठवडय़ात पृथ्वीच्या जवळ येणार असून रात्री पूर्व दिशेला ते वृश्चिक राशीत साध्या डोळ्यांनी पाहायला मिळणार आहेत. ३० मे रोजी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ म्हणजे ७ कोटी ५२ लाख ८० हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. यापूर्वी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ १४ एप्रिल २०१४ मध्ये आला होता. त्या वेळी त्याचे अंतर ९ कोटी २३ लाख ९० हजार किलोमीटर इतके होते, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवार, ३ जून रोजी शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ १ अब्ज ३४ कोटी ९० लाख किलोमीटर इतक्या अंतरावर येणार आहे. यापूर्वी शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ १ अब्ज ३४ कोटी ११ लाख किलोमीटर इतक्या अंतरावर २३ मे २०१५ मध्ये आला होता.