मुंबईतील वांद्रे परिसरातील बँन्डस्टँडनजीक असणाऱ्या एका इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीची ही घटना घडताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. जीवेश बिल्डिंग असं आग लागलेल्या इमारतीचं नाव असून इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर ही आग लागली आहे. या घटनेत जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचं मुंबईतील निवासस्थान असणाऱ्या ‘मन्नत’पासून काही अंतरावरच ही इमारत असल्याची माहिती समोर आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशमन दलाकडून केलं जात आहे. या घटनेबाबतची अधिक माहिती अद्याप मिळू शकली नाही.