लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : परळ येथील सेनापती बापट मार्गावरील कमला मिल कंपाऊंडनजीकच्या टाईम्स टॉवरला शुक्रवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असून सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही.

Massive fire breaks out at scrap warehouses in Mandala area
मंडाळा परिसरात भंगाराच्या गोदामांना भीषण आग, आगीत ६ ते ७ गोदाम जळून खाक
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Maximum temperature drop in Mumbai,
मुंबईच्या कमाल तापमानात घट
Fire Lonar Rural Hospital, Lonar Rural Hospital Patient died,
बुलढाणा : लोणार ग्रामीण रुग्णालयात अग्नितांडव, रुग्णाचा बेडवरच कोळसा; विडीमुळे…
Firing from pistols Kondhwa, pistol Kondhwa ,
कोंढव्यात दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून गोळीबार, पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा
Firing on saraf shop worker in Shahapur
शहापुरातील सरफच्या दुकानातील कामगारावर गोळीबार
Bus catches fire on Mumbai-Goa highway
मुंबई गोवा महामार्गावर धावत्‍या बसला आग, सुदैवाने सर्व ३४ प्रवासी बचावले
Fire Safety Responsibility Kalyan West Vortex Fire
आपल्या अग्निसुरक्षेची जबाबदारी आपलीच!

चौदा मजली टाईम्स टॉवरच्या विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. इमारतीच्या तिसऱ्या ते सातव्या मजल्यांदरम्यान आग पसरली. विद्युत तारांच्या संपर्कात आलेल्या आगीमुळे मोठा आगडोंब उसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, बेस्ट उपक्रम व संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य हाती घेतले.

आणखी वाचा-Madhabi Puri Buch : माधवी पुरी बुच यांच्याविरोधात सेबी कर्मचारी आक्रमक; निदर्शने करत राजीनामा देण्याची केली मागणी

दुसऱ्या मजल्यावरील दरवाजाला कुलुप असल्याने अग्निशामकांनी हातोड्याने ते तोडून आत प्रवेश केला. तसेच, कोणी अडकले नसल्याची खात्री करून आग विझविण्याचे काम सुरू केले. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन सकाळी ६ वाजून ३६ मिनिटांनी क्रमांक एकची वर्दी, तर ६ वाजून ४७ मिनिटांनी क्रमांक दोनची वर्दी देण्यात आली. तसेच, अग्निशमन दलातर्फे विविध अद्ययावत यंत्राच्या साहाय्याने आग विझविण्याचे काम अद्यापही सुरू आहे.

Story img Loader