मुंबई: अंधेरी पश्चिमेकडील लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील एका गगनचुंबी इमारतीत सोमवारी रात्री दहा वाजता भीषण आग लागली. तेरा मजली इमारतीच्या अकराव्या मजल्यावर एका घरात ही आग लागली. आगीचे गांभीर्य वाढले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
अंधेरी पश्चिमेला ओबेरॉय संकुलातील स्काय पॅन इमारतीत ही आग लागली आहे. अकराव्या मजल्यावरील एका सदनिकेत आग लागली असून घराच्या खिडकीतून आगीच्या ज्वाळा आणि धूर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहे. या आगीत घरातील विद्युत वाहिन्या, विद्युत यंत्रणा, घरातील सामान जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचा ताफा आणि पाण्याचे तीन जम्बो टॅन्कर दाखल झाले आहेत.