मुंबईत आगीची मोठी घटना समोर आली आहे. गोरेगाव पूर्व येथील आयटी पार्क मागच्या जंगल परिसरात आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, लेव्हल १ ची ही आग आहे. आग ज्या जंगल परिसरात लागली आहे, तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. या परिसरात बिबट्या, मोर, हरणे असे वन्यजीव प्राणी आहेत. अनेक वनस्पतीही येथे आहेत. मात्र, या भीषण आगीमुळे वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत कोणतीही मानवी हानी झाल्याचं वृत्त नाही. तसेच, आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही.