Malad Fire: मुंबई मधील मालाड येथील कुरार गावात असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. आतापर्यंत या आगीत ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीत एका १४ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच, पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मालाड मधील कुरार व्हिलेज नावाचा परिसर आहे, त्याच्या शेजारी असलेल्या आंबेडकर नगर या भागात आज सकाळी ही भीषण आगल लागली होती. याठिकाणी ३०० पेक्षा अधिक झोपड्या आहेत. या आगीमुळे सिलिंडर स्फोट होऊन आग आणखी भडकल्याची माहिती मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंबेडकर नगर येथील झोपडपट्टी वन जमिनीवर उभारलेली आहे. प्लास्टिक आणि लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने याठिकाणी झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागल्यानंतर येथील रहिवाश्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

आणखी माहिती थोड्याच वेळात…

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive fire breaks out in malad slum one dead kvg